मुंबई : मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या या सहभागी असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.संजय राऊतांच्या या आरोपाविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आता संजय राऊत दोषी आढळले असून त्यांना 15 दिवसांची कैद सुनावली आहे.
संयज राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
आब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना दिलासा; कोर्टाने दिला जामीन; ३० दिवस शिक्षेवर स्थगिती
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.या प्रकरणात शिवडी कोर्टाने त्यानं दोषी ठरवले होते. कोर्टाने संजय राऊतांना १५ दिवसांची कोठडी व २५ हजारांचा दंड देखील ठोठावला होता. शिक्षा सुनावली गेल्यानंतर संजय राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र नायायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर केला आहे. मेधा सोमय्यांनी २०२२ मध्ये संजय राऊतांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
शिवडी कोर्टाने राऊतांना शिक्षा सुनावल्यानंतर राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली व अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर याचिकेवर झालेल्या सुनावणीत राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पुढील ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात दाद मागण्याची मुभादेखील सत्र न्यायालयाने दिली आहे.
मीरा भाईंदरमधील टॉयलेट घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने राखून ठेवला होता. या निकालाची आज (26 सप्टेंबर) सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. हा संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र आता सत्र न्यायालयाने राऊतांना जामीन दिला आहे.