सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. २६: राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर देण्यासाठी सन २००८ पासून रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते.

या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा १ लाख रुपये तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी ३ लाख रुपयांपर्यंत आहे. सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी प्रती घरकुल (शौचालय बांधकामासह) १ लाख ३२ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. शहरी भागात प्रति घरकुल २ लाख ५० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. राज्य शासनाने सन २०२४-२५ या वर्षात या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रासाठी ७५, नगरपरिषद क्षेत्रासाठी ९३, नगरपंचायत क्षेत्रासाठी १४ व ग्रामीण क्षेत्रासाठी ६९७ घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले आहे.

या योजनेच्या लाभासाठी नागरी क्षेत्रातील लाभार्थ्यांनी संबंधित महानगरपालिका कार्यालय, नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात तर ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नदीत सुधार प्रकल्पातील त्रुटींमुळेच पूरस्थिती; जबाबदारांवर कारवाई करा : डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुण्यातील प्रभाग क्रमांक दोनसह अनेक वस्त्यांमध्ये पाणी* धरणांतून पाणी न...

🟥 सोमवार पेठेतील जीर्ण दुमजली वाडा कोसळला

🟨 रहिवाशांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने जीवितहानी टळली; धोकादायक...

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर...