कोथरुडकरांनी लुटला गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद!
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम
पुणे: यंदाचा गणेशोत्सवाचा कोथरुडकरांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले. कोथरुडकरांना गणेशोत्सवात सांस्कृतिक मेजवानीचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील नागरिकांसाठी ‘प्रथम तुला वंदितो!’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.
गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण. दहा दिवस या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांसह, सामाज प्रबोधनपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून नागरिक पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात. कोथरूड हे या सांस्कृतिक राजधानीचे माहेरघर असल्याने, इथल्या गणेशोत्सवाला एक वेगळीच परंपरा मिळालेली आहे.
गणेशोत्सवाच्या या परंपरेचं वैभव वाढविण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘प्रथम तुला वंदितो कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत विविध सांस्कृतिक, सांगितीक आणि करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने प्रा. डॉ. लक्ष्मण जोशी लिखित आणि अभिनेते संदीप पाठक यांनी सादरीकरण असलेले वऱ्हाड निघाले लंडनला नाटकाचा प्रयोग, हिंदी मराठी गीत संगीत आणि विनोदाने नटलेला आनंदोत्सव, आधी वंदू तुज मोरया, सहवास सुरांचा, रंगात रंग, पारिवारिक संगीत मैफल गीतों का सफर आदी सांगितीक कार्यक्रम; प्रसिद्ध स्टॅंण्ड अप कॉमेडियन राजा रॅंचो हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खळखळून हसवणारा कार्यक्रम, विश्वास पठवर्धन यांचा स्वभाव राशींचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच, गणेशोत्सव काळात पुण्याच्या पारंपरिकतेचं वैभव असलेल्या ढोल ताशा पथकांचे स्थिर वादन, महिलांसाठी खेळ पैठणींचा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या सर्व कार्यक्रमांचा कोथरुडकरांनी मदमुराद आनंद लुटला. सांगितीक कार्यक्रमात अनेक जुन्या गाण्यांवर ज्येष्ठ नागरिकांनी ताल धरला. तर स्टँड अप कॉमेडी आणि वऱ्हाड निघाले लंडनला नाट्यप्रयोगाने कोथरुडकर रसिकांना खळखळून हसवले. त्याशिवाय विविध सोसायटीत आयोजित ढोल ताशा पथकांच्या स्थिर वादनांवर तरुणाई थिरकली. या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कोथरुडकरांचा गणेशोत्सवाचा उत्साह अतिशय द्विगुणित झाला होता.