नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध
पुणे-कोथरूड मधील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण होणार असून, त्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन, निधी उपलब्ध करून दिला आहे. आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे भीमप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे.
कोथरूड मधील जयभवानी नगर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी येथील आंबेडकर प्रेमींनी केली होती. महापालिका बरखास्त झाल्याने या मागणीला आवश्यक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून; लोकसहभागातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आज या कामाचे भूमिपूजन झाले.
यावेळी उद्योजक समीर पाटील, स्थानिक नगरसेविका छाया मारणे, भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, रिपाइं आठवले गटाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य ॲड. मंदार जोशी, कोथरुड मंडल अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, भारत भोसले, भाजपा प्रभाग ११ चे अध्यक्ष आशुतोष वैशंपायन, भाजपा महिला मोर्चाच्या स्वातीताई मोहोळ, सौ. मायाताई पोस्ते, भीमाज्ञान प्रसारक संघाचे अध्यक्ष जितेंद्र दामोदरे, सल्लागार तात्या कसबे, विनोद बुचटे, दिपक सगर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.