फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती:स्वतःच्या मुलीची शपथ घेऊन दिला होता शब्द, आमदार एकनाथ खडसे यांचा दावा

Date:

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते, असा मोठा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे व फडणवीस यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रूत आहे. त्यातच खडसेंनी हा दावा करून फडणवीस यांना एकप्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

एकनाथ खडसे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मला एके दिवशी बोलावले होते. तेव्हा आम्ही दोघेच होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी त्यांना म्हणालो, देवेंद्रजी माझा यावर विश्वास बसत नाही. राज्यपाल केले तर आनंदाचीच गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झाले मला माहिती नाही. पण त्यांनी मला आश्वासन दिले होते. ही गोष्ट साधारण 2019 मधली आहे.

एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपासूनच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तसेच त्यांनी दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या, मात्र अद्याप पक्ष प्रवेश झालेला नाही. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, ज्यावेळी मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. दिल्लीतील एका अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केला होता. दिल्लीत असताना भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला होता. त्यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्या. त्यांनीच माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घातला होता. या घटनेला 5 ते 6 महीने झाले, मात्र अजूनही भाजपने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केले नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर मी फुली मारली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, मी प्रवेश घेतो असे कधी म्हणालो नाही, मला प्रवेश घ्या असे सांगण्यात आले होते. त्यानंतरच मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी यावर चर्चा करून गेलो होतो. मी 40 वर्ष भाजपमध्ये काम केले आहे. महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सायकलवर फिरलो. इतके सगळे काम करून भाजपमध्ये मला प्रवेश द्या ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...