पुणे-
पुणे शहर पोलीस दलात १६३३ + १३० पदांसाठीची भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून या भरतीसाठी १,३९,००० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
या भरतीत पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे सुरु असलेल्या पोलीस शिपाई भरतीमध्ये महिला उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणी १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु झालेली आहे. त्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणा-या महिला उमेदवारांपैकी लहान बाळ सोबत असणा-या महिला उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणी प्रथम प्राधान्य देवून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याची व्यवस्था केलेली आहे.असे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील यांनी कळविले आहे.
पुणे पोलीस दलात १७६६ जागांवर भरती सुरु, अर्ज आले १ लाख ३९ हजार
Date:

