पुणे :
भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) मध्ये ‘आयएमईडी जेम्स्-२०२४’ या विद्यार्थ्यांसाठीच्या दोन दिवसीय स्पर्धा महोत्सवाचे उदघाटन भारती विद्यापीठ आयएमइडी चे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे यांच्याहस्ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी झाले. आय.एम.ई.डी.जेम्स महोत्सवात २० स्पर्धांचा समावेश आहेत. या स्पर्धा महोत्सवामध्ये टेक्निकल स्पर्धा,कॉर्पोरेट वॉक,बेस्ट मॅनेजर,स्लो सायकलिंग,डिझाईन फेस्ट,मार्केटिंग तंबोला, प्रश्नमंजूषा अशा स्पर्धांचा समावेश आहे. हा महोत्सव आयएमईडी ( पौड रस्ता कॅम्पस, कोथरुड ) येथे होत आहे. महोत्सवातील सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.डॉ.विजय फाळके,डॉ.वृषाली शितोळे,डॉ.सुचेता कांची,प्रतिमा गुंड यांनी संयोजन केले.१४ सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
‘विद्यार्थीच्या सर्वांगीण विकासासाठी या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भावी काळात ते उपयुक्त ठरेल’,असे मत भारती विद्यापीठ आयएमइडीचे प्रभारी संचालक डॉ अजित मोरे यांनी व्यक्त केले.उपप्राचार्य डॉ.आर.व्ही .महाडिक म्हणाले,’आय एम ई डी हे एक कुटुंब आहे; इथे स्पर्धामधून विद्यार्थीनी चांगली कौशल्ये आत्मसात करावीत.’ भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने व कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ .विश्वजीत कदम आणि कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.