सचिन तेंडुलकर आणि श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया यांच्यामधील सहयोग स्प्रेडिंग हॅप्पीनेस इनदिया फाऊंडेशनने गाठला मोठा टप्पा
स्मार्ट डिजिटल क्लासरूम्सची स्थापना, जे अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि सौर ऊर्जेच्या शक्तीसह सुसज्ज आहेत
· निर्णयात्मक हवामान कृती करण्यासाठी ‘ग्रीन अॅम्बेसेडर्स’च्या समुदायाला चालना
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर २०२४: तरूण विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशासह क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर (सचिन तेंडुलकर फाऊंडेशन – एसटीएफच्या माध्यमातून) आणि डिजिटल ऊर्जा व्यवस्थापन व नेक्स्ट-जनरेशन ऑटोमेशनमधील अग्रणी कंपनी श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया (Schneider Electric India) यांच्यामधील सहयोग स्प्रेडिंग हॅप्पीनेस इनदिया फाऊंडेशन (Spreading Happiness InDiya Foundation) (एसएचआयएफ)ने डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागांमधील तरूण विचारवंतांना सक्षम करण्याच्या त्यांच्या मिशनमध्ये मोठा टप्पा गाठला आहे. या प्रमुख एसएमआयटीए (SMITA) प्रोग्रामच्या माध्यमातून फाऊंडेशनने भारतातील ३०० हून अधिक शाळांमधील ६०,००० विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे. या यशामधून प्रेरणा घेत आणि जागतिक साक्षरता दिन साजरा करत एसएचआयएफने २०२५ पर्यंत ५०० ग्रामीण सरकारी शाळांचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. यामागे भारतातील महत्त्वाकांक्षी भागांमधील १००,००० हून अधिक तरूण वि़द्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे.
एसएमआयटीए (SMITA) प्रोग्रामची खासियत आहे ‘डिजिटल’ क्लासरूम्स, जे ग्रामीण भागांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुविधा देण्यासाठी, तसेच शाश्वततेला चालना देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. आजपर्यंत, एसएचआयएफने देशातील दुर्गम भागांमध्ये असलेल्या ३०० शाळांना डिजिटल क्लासरूम्ससह सुसज्ज केले आहे, तसेच सक्रिय हवामान कृती करण्यास सक्षम असलेल्या ‘ग्रीन अॅम्बेसेडर्स’च्या समुदायाला चालना देण्यासाठी हब्स म्हणून सेवा देते. सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जास्रोतांद्वारे समर्थित हे क्लासरूम्स अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि व्हर्च्युअल प्रशिक्षण संधी देतात, ज्यामुळे शाळांना कार्यसंचालन खर्च कमी करण्यास आणि व्हर्च्युअल प्रशिक्षणाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे.
डिजिटल शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे महत्त्व सांगत श्री. सचिन तेंडुलकर म्हणाले, ”स्प्रेडिंग हॅप्पीनेस इनदिया फाऊंडेशन डिजिटल पोकळी दूर करण्याप्रती समर्पित आहे, ज्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देत आहे, तसेच शाश्वतेचे महत्त्व देखील सांगत आहे. एसएमआयटीए (SMITA) प्रोग्राममधून जबाबदार व ज्ञानी नागरिकांची पिढी घडण्याप्रती आमची समर्पितता दिसून येते, जे आपल्याला शाश्वत भविष्याच्या दिशेने मार्गदर्शन करतील. फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही ठिकाण कोणतेही असो प्रत्येक मुलाला समकालीन विश्वामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध असण्याची खात्री घेण्याप्रती काम करत आहोत.”
दर्जेदार शिक्षण उपलब्ध असणे हे सर्वांगीण शाश्वत विकास संपादित करण्यासाठी महत्त्वाचे आधारस्तंभ आहे. बदलत्या डिजिटल विश्वामुळे शैक्षणिक पायाभूत सुविधांचे वेळेवर आधुनिकीरण व अपग्रेडेशनची गरज निर्माण झाली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.
या ध्येयाबाबत सांगताना श्नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे झोन प्रेसिडण्ट – ग्रेटर इंडिया, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपक शर्मा म्हणाले, ”श्नाइडर इलेक्ट्रिक प्रभाव-संचालित कंपनी आहे आणि शिक्षण दीर्घकालीन, शाश्वत प्रभाव निर्माण करण्यासाठी मुलभूत गरज आहे. आमचा विश्वास आहे की, ऊर्जा व शिक्षणाची उपलब्धता मुलभूत मानवी अधिकार आहे. आमचे डिजिटल क्लासरूम्स ग्रामीण समुदायांना सक्षम करण्यासाठी ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाचे नेतृत्व करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतात. आम्ही ३०० शाळांमधील ६०,००० विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे आणि २०२५ पर्यंत ५०० शाळांचा कायापालट करण्याचा मनसुबा आहे. आम्हाला भावी पिढीला शिक्षित व सक्षम करण्यासाठी, तसेच हवातान बदल व शाश्वततेवरील कृतींना चालना देण्यासाठी श्री. सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सहयोग करण्याबाबत सन्माननीय वाटते.”
एसएमआयटीए (SMITA) प्रोग्राम पर्यावरण व ऊर्जा संवर्धनावरील परस्परसंवादी अध्ययन उपक्रमाच्या माध्यमातून ‘ग्रीन अॅम्बेसेडर्स’च्या इकोसिस्टमला निपुण करण्याप्रती कटिबद्ध आहे. हा प्रोग्राम विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योग्य व पर्यावरणास-अनुकूल निवडी करण्याकरिता माहिती व शिक्षण देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
एसएचआयएफचा नाविन्यपूर्ण एसएमआयटीए (SMITA) प्रोग्राम उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटक अशा १२ राज्यांमधील, तसेच काही महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमधील सरकारी शाळांवर सकारात्मक प्रभाव घडवून आणत आहे. फाऊंडेशन विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करून देत विनाव्यत्यय अध्ययन मिळण्याची खात्री घेण्याप्रती कटिबद्ध आहे.