मुंबई-बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-वडील झाले आहेत. दीपिकाने एका मुलीला जन्म दिला आहे. या अभिनेत्रीला शनिवारी दुपारी मुंबईतील गोरेगाव परिसरातील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . तिच्यासोबत रणवीर सिंग आणि तिचे कुटुंबीयही उपस्थित होते.
याआधी 6 सप्टेंबरला दीपिका बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती.दीपिकाने या वर्षी 28 फेब्रुवारीला सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिने एक पोस्ट शेअर करत लिहिले की ती सप्टेंबर 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे.काही दिवसांपूर्वीच दीपिकाने तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिनेत्रीने सोमवारी संध्याकाळी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 14 फोटो शेअर केले.हे फोटो शेअर करून दीपिकाने एकप्रकारे त्या लोकांना उत्तर दिले आहे जे तिला प्रेग्नेंसी फेक म्हणत होते. यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये अभिनेत्रीची डिलिव्हरीची तारीख 28 सप्टेंबर असल्याचे सांगण्यात आले होते.