पुणे- २ पिस्टलसह खडी मशीन चौकात चोरी करणाऱ्याला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ कडून पकडण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही या पथकाने पकडले आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दरोडा व वाहन चोरी विरोधी दोन पथकातील पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांचे पथकातील पोलीस अंमलदार गस्त करीत असताना सहायक पोलीस फौजदार आटोळे यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एक इसम अग्निशास्त्र विक्रीसाठी येत आहे सदर मिळालेल्या बातमीवरून कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत पारसी मैदान या ठिकाणी सापळा लावून बाबू बळीराम हरणे वय 41 वर्ष रा.गोसावी वस्ती हडपसर याला पकडले तेव्हा त्याच्या अंगझडतीमध्ये दोन देशी बनावटीचे पिस्टल व दोन राउंड असा अंदाजे 80 हजार 450 रुपये किमतीचे बेकायदेशीर शस्त्र सापडले . त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता तो कोंढवा पोलिस स्टेशनच्या एका दाखल गुन्ह्यात WANTED आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने खडी मशीन चोरी चा गुन्हा हा फिरोज खान याचेसमवेत केल्याचे सांगितले. त्याच चोरीच्या गुन्ह्यातील दुसरा WANTEDआरोपी फिरोज याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले आहे.
बाबू बळीराम हारणे वय ४१ वर्ष याचेकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल (आग्निशत्र ) व दोन ७.६५ MM मिळून आल्याने त्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच फिरोज नजीर खान वय ३९ वर्ष रा.भारत कॉलनी हांडेवाडी रोड हडपसर हा गुन्ह्यात WANTED आरोपी असल्याने त्यास पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यातआले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजन कुमार, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे व सहा.पोलीस आयुक्त गुन्हे -2 इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक संदिपान पवार व पोलीस अंमलदार यांनी केली.