सध्याचे भोंदूबाबा ,बुवा हे सरकारच्याच आश्रयाखाली : धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही?

Date:

‘अंनिस’च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा
बुलढाणा-सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री, बागेश्वर यांच्या सारखे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे. अशोक खरातवर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले. पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला. राज्यात बुवा बाबांचे प्रस्थ वाढवण्याचे, त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या पार्श्वभूमीवर अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ‘वृक्ष तिथे छाया… बुवा तिथे बाया’ जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत असून बुलढाणा येथे श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विश्राम भवन येथे आज 20 एप्रिल रोजी शाम मानव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्याची स्थिती व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य यावर त्यांनी भूमिका मांडली. पुढे बोलताना प्रा. मानव म्हणाले, काँग्रेसच्या काळात बुवा बाबांवर एफआयआर दाखल करताना पोलीस स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे तर आता सरकारच्या संमतीशिवाय काहीही करता येत नाही. खरातसारख्या भोंदू बुवा बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातूनच सुरू आहे.

ते पुढे म्हणाले, बीजेपी मंत्रिमंडळातील एका मोठ्या मंत्र्यांने मुख्यमंत्री होण्यासाठी खरात बाबाकडे पूजा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यावर कारवाई झाली. वास्तविक पाहता धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा यांच्यावरही आरोप आहे. कायद्यानुसार या दोघांवर कारवाई करने सहज शक्य आहे. मात्र खरात सारखा न्याय या लोकांना लावण्यात आलेला नाही. खरात वाईट व इतर चांगले असे होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षापासून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रचार आणि अंमलबजावणी करण्यात येत नाही.
अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. कामही सुरू झाले, मात्र फडणवीस यांनी नुसते झुलवत ठेवले. सरकारने या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. हा कायदा राबवायचाच नाही असे त्यांचे ठरले असल्याचे श्याम मानव म्हणाले. अधिकाऱ्यांवर, यंत्रणांवर फार मोठे दडपण आहे. अशी अवस्था आपण अख्या आयुष्यात कधी पाहिली नाही.

काँग्रेसच्या काळात गुलाब बाबाचे भक्त शंकराव चव्हाण आणि सत्यसाईबाबा भक्त विलासराव देशमुख सारखे मोठे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करीत. आता साधा नगरसेवक येऊन काम बंद पाडतो. अलीकडच्या काळात जादूटोणाविरुद्ध कायद्याचा प्रचार प्रसार झाला असता तर खरात सारखा बाबा उदयास आलाच नसता. या प्रकरणात अनेक लोक अडकले त्याला जबाबदार राज्य सरकार असल्याचा घनाघात त्यांनी केला.

रूपाली चाकणकर देखील आरोपीच

खरात प्रकरणाची सुरुवात एका पत्रकारापासून झाली. ज्या पत्रकाराने आवाज उठवला त्याला फोन करून रूपाली चाकणकर यांनी दम भरला होता. आरोपीला सहाय्य करणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हा आहे.त्यामुळे रूपाली चाकणकर यामध्ये आरोपी आहे असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचा सहभाग तपासला पाहिजे

खरात वर ॲक्शन होण्याचे पुन्हा एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि रूपाली चाकणकर यांच्याशी असलेली जवळीक असू शकते. त्याचे संबंध कसे आहे हा पोलिस तपासाचा भाग आहे.भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री होण्यासाठी पूजा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष प्रकरणाकडे गेले व खरात वर कारवाई झाली असे श्याम मानव पत्रकार परिषदेत म्हणाले.

या पत्रकार परिषदेला अ.भा. अंनिस राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, मराठवाडा संघटक किशोर वाघ,जिल्हा संघटक प्रमोद टाले, जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर,सुनील भाऊ जावंजाळ पाटील, दत्ताभाऊ सिरसाठ, महिला संघटक प्रतिभा भुतेकर, सचिव आशिष गवई, विवेक हिवाळे, सुमेध जाधव ,नानाभाऊ मोरे आदींची उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भवानी पेठ पालखी मुक्काम स्थळाच्या सोयी-सुविधांची पाहणी संपन्न; प्रशासकीय सज्जतेवर भर

पुणे: भवानी पेठ येथील पालखी मुक्काम स्थळाची आज प्रशासकीय...

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व कृषी विभाग अॅक्टिव्ह मोडवर

खरीप हंगाम २०२६-२७ आढावा बैठक व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न पुणे,...

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनसंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न शेतकऱ्यांना खते-बियाणे...

आज सूरत, उद्या मुंबई-पुणे?:गुजरातमधील परिस्थितीवरून रोहिणी खडसे आक्रमक; सूरतमधील गॅस टंचाईचा महाराष्ट्राला इशारा

मुंबई-गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा...