पुणे- शेअर ट्रेडिंगच्या नावाने २ कोटी ८९ लाखाची फसवणूककरून फरार झालेला भामटा १२ लाखाची किया विकताना पुणे पोलिसांनी पकडला .दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 2 कडून कार चोरीच्या व फसवणुकीचे गुन्ह्यात शंकर रावसाहेब शिंदे वय ३३ वर्ष रा रावताळे कुरुडगाव ता शेवगांव जिल्हा अहमदनगर याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
दरोडा व वाहन चोरीविरोधी दोनचे पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांचे पथकातील पोलीस अंमलदार खरपुडे याना खबर मिळाली की, एक व्यक्ती नंबर नसलेली काळ्या रंगाची किया कार विक्री साठी फिरत आहे व संशयीत आहे. त्यावर सापळा रचून साडेसतरानळी हडपसर या ठिकाणी शंकर रावसाहेब शिंदे (वय ३३ वर्ष रा रावताळे कुरुडगाव ता शेवगांव जिल्हा अहमदनगर) याला पकडण्यात आले .त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर कार क्रमांक एमएच १६ डीजी ९५१८ किंमत अंदाजे १२०००००/- रू असा असून त्या बाबत शेवगाव पोलिस स्टेशन येथे कार चोरीचा गुन्हा दाखल आहे. अधिक चौकशी करून या आरोपीने शेवगाव तालुक्या मधील लोकांकडून शेअर ट्रेडिंग मधे १०% प्रति महिने परतावा मिळवून देतो आसे सांगून बऱ्याच लोकांची रुपये ०२ कोटी ८९ लाख ची फसवणूक केली असून त्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६२०/२०२४ कलम ४२०,४०६,४०९,३४ भा द वी दि २५/०७/२४ रोजी नोंद आहे .
शा प्रकारे कार चोरी व फसवणूक असे दोन स्वतंत्र गुन्ह्यातील WANTEDआरोपी यास चोरीच्या कार सह ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार,अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 2 पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी केली आहे