प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांचे निर्देश
पुणे, दि. ३१ ऑगस्ट २०२४: सुरळीत वीजपुरवठा ही महावितरणची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ज्या भागात वारंवार वीजप्रश्न निर्माण होत असेल तर त्या ठिकाणच्या वीज यंत्रणेतील तांत्रिक उपायांचे किंवा फेरबदलाचे तसेच पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था आणखी सक्षम करण्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी दिले. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये गुरुवारी (दि. २९) आयोजित बैठकीत पुणे परिमंडलातील वीजपुरवठा, वीजयंत्रणा व वीजबिल वसूलीचा उपविभागनिहाय आढावा घेताना श्री. खंदारे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. सिंहाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक संचालक श्री. खंदारे म्हणाले की, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेत तांत्रिक फेरबदल करण्याचे नियोजन आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नव्या वीजवाहिनीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन वीजयंत्रणेसाठी जागेची उपलब्धता कमी होत आहे. शहरांच्या आसपास नागरीकरण वाढले आहे. या ठिकाणी वाढलेल्या विजेच्या मागणीचा भार शहरात अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेवर देऊ नये. त्याऐवजी या शहरांजवळ नवीन उपकेंद्र किंवा वीजयंत्रणा उभारण्याचे प्रस्ताव तयार करावेत असे निर्देश त्यांनी दिले.
वीजबिलांच्या वसूलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यात १०० टक्के चालू वीजबिलांची वसूली अपेक्षितच आहे. यासोबत