Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ऐतिहासिक लाल महाल चौकात 35 मंडळांची संयुक्त दहीहंडी , ‘पुनीत बालन ग्रुप’ चा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्तुत्य उपक्रम

Date:

पुणे : – ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. शहरातील चौकाचौकात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळा’चे उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात हा दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी यासबंधीची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि गुरुजी तालीम मंडळ एकत्र येऊन दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अल्पावधीतच ही दहीहंडी लोकप्रिय ठरली. दरम्यान शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यातच अनेक मंडळांकडून प्रमुख रस्ते आणि चौकात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल होतात. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. तसेच प्रत्येक मंडळाने स्वतंत्र दहीहंडी कार्यक्रम आयोजित केल्यास ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. ही बाब लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळाना एकत्र येऊन संयुक्त दहीहंडी करण्यासंबंधीचे आवाहन केले होते. त्यांच्या सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील प्रामुख्याने मध्य पुण्यातील तब्बल ३५ सार्वजनिक मंडळांनी पाठिंबा देत सयुंक्त दहीहंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या दि. २७ ऑगस्ट रोजी कसबा पेठेतील ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात सार्वजनिक गणेश मंडळांचा संयुक्त दहीहंडी कार्यक्रम होणार आहे. त्यात सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.
संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी मंडळे

  • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
  • श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
  • श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
  • श्रीमंत पेशवे गणपती मंदिर
  • पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती
  • नवग्रह मित्र मंडळ ट्रस्ट
  • श्री साने गुरुजी तरुण मंडळ
  • हुतात्मा भगतसिंग मित्र मंडळ
  • त्रिमूर्ती मित्र मंडळ (माणिक चौक)
  • जनार्दन पवळे संघ
  • सुयोग मित्र मंडळ संयुक्त सिद्धीविनायक मित्र मंडळ
  • क्रांतीवीर राजगुरु मंडळ
  • श्री हनुमान मंडळ (अग्रवाल तालीम)
  • क्रांतीरत्न चंद्रशेखर आझाद मंडळ
  • जनता जनार्दन मंडळ
  • विजय अरुण मंडळ ट्रस्ट
  • व्यवहार आळी चौक मंडळ
  • श्री अभिमन्यू मंडळ ट्रस्ट
  • श्रीकृष्ण मित्र मंडळ
  • फणी आळी तालीम ट्रस्ट
  • तरूण शिवगणेश मित्र मंडळ ट्रस्ट
  • ऑस्कर मित्र मंडळ
  • प्रकाश मित्र मंडळ
  • लोखंडे तालीम संघ
  • त्वष्टा कासार समाज संस्था
  • भोईराज मित्र मंडळ
  • थोरले बाजीराव मित्र मंडळ
  • भरत मित्र मंडळ
  • प्रभात प्रतिष्ठान
  • लाल महाल नवरात्रौ उत्सव समिती
  • श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव मंडळ
  • सूर्योदय प्रतिष्ठान, खराडी
  • गणेश मित्र मंडळ (अलका चौक)
  • श्री गजानन मंडळ (लक्ष्मी रोड)
  • गुरुदत्त मित्र मंडळ (मंडई)

‘‘दरवर्षी शहरात अनेक सार्वजनिक मंडळांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र, उत्सवाच्या या वाढत्या स्वरुपाने पोलीस प्रशासनावर सुरक्षा व्यवस्थेचा ताण पडतो, वाहतूक कोंडी होते आणि ध्वनी प्रदूषणही होते. त्यातून मार्ग काढून पोलिस बाधवांना सहकार्य करण्याच्यादृष्टीने आणि पुणेकरांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही यावर्षी संयुक्त दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. जवळपास सर्वच प्रमुख सार्वजनिक मंडळांनी या निर्णयाला पाठिंबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व मंडळांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.’’

  • पुनीत बालन
    उत्सव प्रमुख व विश्वस्त (श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

२० ते २५ वाहनांना धडक, ८ जणांचा मृत्यू ,२० जण जखमी

वाचवा वाचवा! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना; कार पूर्णपणे जळून...

१ किलो सोने चोरून पळालेल्या भामट्याला पोलिसांनी पकडले,सर्व सोनेही केले हस्तगत.

पुणे- एक किलो सोने चोरी करुन, पोलीसांना गुंगारा देणा-या...

कात्रजमध्ये अफू विकणाऱ्या देवीलालला पकडले

पुणे- पुणे पोलिसांनी कात्रज मध्ये अफू विकणाऱ्या देवीलाल ला...

बाजीराव रस्त्यावरील जुगार अड्डयावर छापा: ९ जण पकडले

पुणे- बाजीराव रस्त्यावर फुटक्या बुरुजा जवळील फ्लॅट मध्ये गेली...