Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

समाज सकारात्मक दिशेला न्या:प्रिया मालवणकर 

Date:

पुणे:
भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्रा.रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमी आयोजित ४२ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी दि.२१ ऑगस्ट रोजी विविध सत्रे , पुरस्कार वितरण, चर्चा , पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम पार पडले.उपासना गुरु प्रिया मालवणकर (मुंबई)यांच्याहस्ते दुसर्‍या दिवशीच्या सत्रांचे उद्घाटन झाले . अध्यक्षस्थानी डॉ .चंद्रकला जोशी(संभाजीनगर) होत्या.सौ.शुभांगिनी पांगारकर (नाशिक) यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार देण्यात  आला,तर कै.शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.गौरी केंजळे यांना देण्यात  आला.अधिवेशनाच्या या दुसऱ्या दिवशी देखील ज्योतिषविषयक पुस्तके  प्रकाशित करण्यात  आली. नवनीत मानधनी(पुणे) ,बन्ने आण्णा ,पं .राजकुंवर करवाल(अहमदाबाद), बॅ.पंकज सुतार, नितीन कुंजीर ,आदिनाथ साळवी , राजकुमार राठोड ,बी. जी. पाचरणे,अप्पा नवले , विजय खांदवे,सौ.पुष्पलता शेवाळे,सौ.ऋतुजा शेवाळे  उपस्थित होते. उद्यान प्रसाद मंगल कार्यालय(सदाशिव पेठ) येथे अधिवेशनाची सर्व सत्रे झाली.

उदघाटन सत्रात बोलताना प्रिया मालवणकर म्हणाल्या,’समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी ज्योतिषावर आहे. आपण गुरु आणि अवगुरू यातील फरक ओळखायला शिकले पाहिजे.ज्योतिषशास्त्राचा बाजार मांडू नये. रत्न बाळगून कोणाला आकर्षित करता येते, अशी अंधश्रद्धा पसरवू नये. ज्योतिषी, पुरोहित अकाली मृत पावला तर जर कोणी त्यांच्या कुटुंबियांना  मदत करणार नसेल, तर ही चांगली गोष्ट नाही’. ‘समाजात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत’, असे आवाहन लायन्स क्लब चे माजी प्रांतपाल राजकुमार राठोड यांनी केले .बॅ.पंकज सुतार म्हणाले ‘ अखिल भारतीय अधिवेशनातून सतत ४२ वर्ष ज्योतिषविषयक जागरण करण्याचे मोठे काम चंद्रकांत शेवाळे यांनी केले आहे .ज्योतिष ही विधायक चळवळ असून ती पुढे नेण्याचे काम या अधिवेशनातून केले जात आहे’.सौ.गौरी केंजळे ,ह.भ.प.अर्चना जोगदेव यांनी सूत्रसंचालन केले.
दिवसभर पार पडलेल्या सत्रांमधून ग्रहमाला,भृगु नंदी नाडी,रत्नशास्त्र,कवडीशास्त्र,हृदयरेषा,वास्तुशास्त्र,कृष्णमूर्ती ज्योतिष,साउंड थेरपी,पत्रिका आणि योग,त्रिक स्थानाचे महत्व अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.एड.मालती शर्मा,नवीनकुमार शहा यांच्या उपस्थितीत समारोप झाला.देशभरातून ज्योतिष अभ्यासक उपस्थित होते. 
जीवनगौरव  आणि आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार

अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात सौ.शुभांगिनी पांगारकर (नाशिक) यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार देण्यात  आला, त्या ज्येष्ठ ज्योतिषतज्ज्ञ आहेत.  कै.शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.गौरी केंजळे यांना  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात  आला.आचार्या सौ गौरी कैलास केंजळे या केपी बेसिक अँड अडवांस,  मोबाईल न्युमेरॉलॉजी  रेमेडिज, मेडिकल न्यूमेरोलोजी, क्रिस्टल विषयाच्या मार्गदर्शक आहेत.गौरी कैलास ज्योतीष संस्थेच्या संचालक आहेत. मोबाईल न्यूमेरेलॉजी, सुलभ केपी,  क्रिस्टल्सच्या अद्भुत  दुनियेत, फलादेशाचे तंत्र ( उपयुक्त पायऱ्या)  या   ग्रंथाच्या  त्या लेखिका आहेत. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

५० हजाराच्या कर्जाने घेतले शेतकरी माय लेकरांचे जीव

गेवराई -कर्जबाजारी शेतकरी मुलाने राहत्या घरी पत्र्याच्या‎आडूला दोरीने गळफास...

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे-साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११...

PMPML बसने चांदणी चौकात ६ खाजगी वाहनांना उडविले , ,PMPML आणि RTOबद्दल संताप,नागरिकांची चिंता आणि सुरक्षेचा प्रश्न

चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांतदादा सरसावले-जखमींवर उपचाराचा सर्व खर्च...