पुणे-एसटी ची लाल परी नाही कि , पीएमपी ची बस नाही चक्क पुणे ते दिल्ली विमान प्रवासात विमानात सीटवर बसण्याच्या कारणावरून वाकड च्या एका महिलेने चक्क महिला पोलिसाला मारहाण केल्याची तक्रार विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अद्याप वाकडच्या या महिलेला पोलिसांनी अटक केलेली नाही. मात्र घरातील काही घटनामुळे व्यथित असल्याने मानसिक तणावाखाली या महिलेने दुसऱ्या महिला पोलिसाला मारहाण केल्याचे समजते.
सीआयएसएफ पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका रेड्डी (वय २६) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरेखासिंग (वय ४४, रा. कुमार पिकाडेली सोसायटी, संतोषनगर, वाकड) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विमानतळ पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३९८/२०२४,नुसार भारतीय न्याय संहिता कलम १३२,१२१(१),३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ज्यात फिर्यादी एक महिला सीआयएसएफ पोलीस कॉन्स्टेबल रा. हिरा रेसीडेन्सी बॅरेक, पुणे असून तिला मारहाण करणाऱ्या वाकडच्या महिलेला पोलिसांनी नोटीस दिली आहे.
दि.१७/०८/२४ रोजी १९/४५ पुणे दिल्ली प्लाईट मध्ये हि घटना घडली .यातील फिर्यादी ह्या सीआयएसएफमध्ये पोलीस कॉस्टेबल या पदावर कार्यरत आहे. नमुद महिला हिने नगुद ठिकाणी प्लाईटमधील पॅसेजर सीटवर बसण्याचे कारणावरुन भांडण करुन अन्य प्रवाशी त्यांना मारहाण केल्यामुळे फिर्यादी ह्या नमुद महिलेस समजावुन सांगत असताना सदर नमुद महिलाने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला.असे फिर्यादीत म्हटले आहे .पोलीस फौजदार होळकर मो.नं. ९८३४९४२८०२ याप्रकरणी तपास करत आहेत.