पुणे-महाराष्ट्र पोलिस हे महाराष्ट्राची शान आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र पोलिसांना सातत्याने अपमान सहन करावा लागत आहे. भाजपचे आमदार, जे स्वतः 24 तास पोलिसांच्या सुरक्षेत असतात ते नितेश राणे यांनी अनेकदा पोलिसांचा, पोलिसांच्या पत्नींचा, कुटुंबाचा अपमान केला आहे.सातत्याने पोलीस बांधवांबद्दल मुजोरिची भाषा वापरुन पोलीस कर्मचाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या नीतेश राणे यांच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे झालेल्या या आंदोलनात नीतेश राणेंचा व त्यांना अभय देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. नीतेश राणे हे आमदार या महत्वपूर्ण जबाबदार पदावर असताना बेताल वक्तव्य सातत्याने करत आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पोलिस हे महाराष्ट्राचे पहारेकरी आहेत भाजपचे घरगडी माहीत, महाराष्ट्र पोलिस महाराष्ट्राची शान अशा घोषणांनी संपूर्ण शिवाजीनगर परिसर दणाणून गेला होता. आमदार नितेश राणे यांनी एक दिवस पोलिसांच्या सुरक्षेशिवाय फिरून दाखवावे असे आव्हानही प्रशांत जगताप यांनी केले. सदर आंदोलन प्रसंगी श्री प्रशांत जगताप , किशोर कांबळे, उदय महाले, स्वाती पोकळे, अजिंक्य पालकर, दीपक कामठे, दिलशाद शेख, स्वप्नील जोशी, अपर्णा पाटसकर, केतन ओरसे, फाईम शेख आणि मोठ्या संखेने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.