पुणे- भर दिवसा, ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळेत म्हणजे १० वाजून ५० मिनिटांनी आपल्या वाहतूक शाखेच्या सहकारी पोलिसांच्या समवेत वाहतूक नियमन करत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला धनकवडीच्या एका दुचाकीस्वार युवकाने बेदम मारहाण करत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबधित युवकाला अटक केली आहे. आशीष रामचंद्र चव्हाण (वय ३७ वर्ष रा. चंद्राई हाईटस, फ्लॅट नं. १, धनकवडी पुणे) असे या युवकाचे नाव असून मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव दिपक सदाशिव भोईर (पोलिस अमंलदार, नेमणुक वाहतूक शाखा, पुणे शहर) असे आहे .
भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ६५९/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १३२,१२१ (२),११५ (२), ३५२,३५१ (२) मोवाका १८४,१३० (१), १७७,३(१)१८१ अन्वये गुन्हा दाखल करून आशीष रामचंद्र चव्हाण वय ३७ वर्ष रा. चंद्राई हाईटस, फ्लॅट नं. १, धनकवडी पुणे याला अटक केली दिनांक १६/०८/२४ रोजी १०/५० कात्रज बायपास चौक कात्रज पुणे येथे हा प्घरकार डला .
यातील फिर्यादी पोलीस अंमलदार भोईर हे शासकीय गणवेशात त्यांचे इतर पोलीस सहका-यांन सोबत कात्रज बायपास बौकात वाहतुक नियमन करत असताना आशिष हा त्याचे ताब्यातील दुचाकी ही जोराने व वेडीवाकडी चालवून वाहतुक नियमभंग करत आल्याने त्याला बाजुला घेवून लायसन कागदपत्र मागत असता त्याने फिर्यादी सोबत अरेरावी व उध्दट वर्तन करत फिर्यादी यांना हाताने मारहान करुन फिर्यादी पोलीसाच्या डाव्या गुडघ्यावर व कंबरेवर जोरजोराने लाथा मारून फिर्यादी यांचे डाव्या गुडघ्याला गंभिर दुखापत करून वाईट शिवीगाळ करून फिर्यादी यांचा शासकीय गणवेषाचा खिसा फाडून जिवे ठार मारण्याची धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला . सहायक पोलीस निरीक्षक शेडे मो नं.९५२७३५६२९० हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.