अलार्ड युनिव्हर्सिटीच्या पहिल्या बॅचच्या दिक्षारंभ
पुणे, १७ ऑगस्टः ” कठोर परिश्रम, कार्यात सातत्य, कामाची जिद्द, चिकाटी आणि नव नविन गोष्टी शिकण्याची सवय असल्यास कोणत्याही विद्यार्थीच्या पदरी यश नक्कीच पडेल. तसेच वेळेचे नियोजन आणि मल्टी टास्कींग स्किलच्या जोरावरच भविष्य उज्वल बनविता येईल.” असा सल्ला एवनच्या वर्च्युअल एज्युकेशन विभागाचे राष्ट्रीय प्रमुख विनय सिंग यांनी दिला.
‘हम अलग है, हम अलार्ड है ’ या बोध वाक्याने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू झालेल्या अलार्ड युनिव्हर्सिटीच्या पहिल्या बॅचच्या दिक्षारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ते बोलत होते.
यावेळी इनोव्हेशन इंडियाच्या डिजिटल इंजिनियरिंगचे उपाध्यक्ष मुकुंद वांगीकर, आयबीएम टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. प्रदीप वायकोस हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अलार्ड विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. एल. आर. यादव हे होते.
तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पूनम कश्यप आणि अलार्ड चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. राम यादव उपस्थित होते.
विनय सिंग म्हणाले, ” जागतिकरणाच्या काळात मार्केट ट्रान्सफॅर्म होत आहे. अशा वेळेस २०३० पर्यंत नव्याने येणार्या कोणत्याही कंपन्यांचे आयुष्य हे केवळ १० वर्षांचे असेल. त्यामुळे ज्यांच्याकड कौशल्य असेल तेच आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकतील. भविष्यात जवळपास सर्वच कंपन्या या कौशल्यावर आधारित असल्याने अध्ययन करतांना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्यांचा विकास करावा. तसे झाल्यास नोकरी करतांना या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची गरज भासणार नाही.”
डॉ. एल.आर. यादव म्हणाले,” येथे नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे विद्यार्थी तयार होतील. कठोर परिश्रम, प्रामाणिकता, व्यावहारीक ज्ञान असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. यावर्षी विद्यार्थ्यांना ४ कोटी रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. जीवनात प्रगती साधायची असेल तर आई वडिलांची सेवा आणि कष्ट करण्याची ताकत अंगी बाळगा.”
डॉ. पूनम कश्यप म्हणाल्या,” ज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या करियरला आकार दिला जाईल. त्यांच्या कला गुणांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी तयार केले जाईल. शारीरिक व मानसिक सशक्त बनविण्यासाठी येथील अनुभवी शिक्षक व त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नवनिर्मिती, संशोधन व प्रकल्पांवर आधारित शिक्षण दिले जाईल.”
या नंतर मुकुंद वांगीकर व डॉ. प्रदिप वायकोस यांनी भविष्यात वेगवेगळ्या कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांची कोणत्या प्रकारे मागणी असेल यावर भाष्य केले. तसेच जीवनात अनेक समस्या उद्भवतील परंतू त्याला न डगमगता अनुभवाच्या जोरावर त्या समस्येवर कसा विजय मिळवावा हे सांगितले.
यावेळी विद्यापिठाच्या एचआर विभागाच्या संचालिका श्वेता यादव, फार्मसीच्या अधिष्ठाता सोनिया सिंग, स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे डॉ.डी.के. त्रिपाठी, स्कूल ऑफ इंजिनियरिंगचे अधिष्ठाता डॉ. आशिष दीक्षित, स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसायन्सेसचे अधिष्ठाता डॉ. अजय जैन, स्कूल ऑफ मिडियाचे प्रमुख प्रा.अमित छत्री, स्कूल ऑफ लॉ चे प्रमुख अॅड. युवराज श्रीपतराव धविले हे उपस्थित होते.
विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. अनन्या अर्जुना यांनी आभार मानले.