मुंबई, 16 ऑगस्ट 2024
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे आज (16.08.2024) नैरोबी इथून मुंबई विमानतळावर आलेल्या एका महिला प्रवाशाला तपासणीसाठी रोखले.
प्रवाशाच्या सामानाची तपासणी केल्यावर 2 शॅम्पू/लोशन बाटल्यांमधील 1983 ग्रॅम स्निग्ध द्रव पदार्थ जप्त करण्यात आला.पदार्थाची चाचणी केल्यावर तो एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत समाविष्ट असलेला ‘कोकेन’ हा अमली पदार्थ असल्याचे सिद्ध झाले.अमली पदार्थांच्या तस्करांनी विशिष्ट पद्धतीच्या मदतीने द्रव स्वरूपातील कोकेन शॅम्पू/लोशनच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवले होते. या द्रव पदार्थाचे स्वरूप देखील शैम्पू/लोशन सारखेच होते,जेणेकरुन ते सहज पकडले जाणार नाही.
तस्करी करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अवैध बाजारातील किंमत अंदाजे ₹ 20 कोटी इतकी आहे.
एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदींनुसार तस्करी करणाऱ्या प्रवासी महिलेला अटक करण्यात आली आणि तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत आली.