पिंपरी, पुणे (दि. १६ ऑगस्ट २०२४) शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात सलग वीस वर्ष निस्पृहपणे काम करणारे सचिन साठे हे पिंपरी चिंचवड शहरातील अजातशत्रू व अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. सचिन साठे यांनी महाविद्यालयीन काळात कबड्डी स्पर्धेत राज्यस्तरावर प्रतिनिधित्व केले. त्या काळातील त्यांच्या संघटन कौशल्यामुळे शहरामध्ये त्यांना राजकीय पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सलग वीस वर्ष गुणवंत विद्यार्थी व शहरातील मान्यवरांचा गौरव करणाऱ्या सचिन साठे सोशल फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट निमित्त पिंपळे निलख येथील मुख्य बस स्टॉप चौकात सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी शंकर जगताप बोलत होते. यावेळी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप व सचिन साठे आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते दहावी-बारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मान्यवर नागरिकांचा सत्कार करण्यात आला. बारावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार आणि रोख रक्कम पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच दहावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय सुरज काळुराम नानगुडे स्मृती पुरस्कार रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, स्कूल बॅग आणि सन्मानचिन्ह तसेच इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महापौर दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड तसेच भुलेश्वर नांदगुडे, निवृत्त एसीपी गायकवाड, नितीन इंगवले, अनंत कुंभार, काळूराम नांदगुडे, रमेश बापू साठे, लक्ष्मण दळवी, संकेत चोंधे, अरविंद रणदिवे, विजय जगताप, अनिल संचेती, भरत इंगवले, गणेश कस्पटे आदींसह परिसरातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन दगडू कणसे, समाधान बाबर, श्रीमती अरुणा विलास सूर्यवंशी, पै. रोहित माकर, शामराव केदारी, जयवंतराव रानवडे, सुनील बबनराव अडसुळे, राजूभाऊ गुंड, नितीन पाटील, भगवानराव इंगवले, अनुष्का सचिन साठे, राकेश गिरमे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
आमदार अश्विनी जगताप व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पिंपळे निलख ते डेक्कन या पीएमपी बसचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय केले.