पुणे-पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १५ ऑगस्ट रोजी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी सेवादलाचे वतीने ध्वजवंदनाची गीते सादर करण्यात आली. यानंतर ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘भारताच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस फार महत्वाचा आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला सोडवण्यासाठी अनेक देशप्रेमींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले. या सर्वच क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी सर्व भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिकांना नतमस्तक होत आदरांजली वाहिली पाहिजे.
स्वातंत्र्य दिन भारतातील ब्रिटिश राजवटीचा अंत आणि भारताच्या स्वातंत्र्य युगाची आठवण करून देत असतो.
ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांची आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे. आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.’’
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, रमेश बागवे, मोहन जोशी, अनंत गाडगीळ, दिप्ती चवधरी, ॲड.अभय छाजेड, दत्ता बहिरट, कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड, रफिक शेख, अजित दरेकर, चंदूशेठ कदम, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, अविनाश साळवे, सतिश पवार, राजेंद्र भुतडा, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, सेवादलाचे प्रकाश पवार, आशितोष शिंदे, सुनिल मलके, बाळासाहेब अमराळे, द. स. पोळेकर, रवि ननावरे, भुजंग लव्हे, अनिल सोंडकर, अण्णा राऊत, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, बळिराम डोळे, सुमित डांगी, विनोद रणपिसे, राज अंबिके, ॲड. अनिल कांकरीया, ॲड. रमेश पवळे, फैय्याज शेख, वाहिद निलगर, अर्चना शहा, उषा राजगुरू, छाया जाधव, रजिया बल्लारी, नलिनी दोरगे, मीरा शिंदे, सुंदरा ओव्हाळ, सुनिता नेमुर, इंदिर अहिरे, सीमा सावंत, संगीता क्षिरसागर, अनुसया गायकवाड, बेबी राऊत, वैशाल रेड्डी, स्वाती शिंदे आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.
यानंतर स्वातंत्र्य सैनिक स्व. दिंगबर ढवळे यांच्या पत्नी श्रीमती. भीमाबाई दिगंबर ढवळे तसेच काँग्रेसप्रेमी ॲड. विनायक चिटणीस यांचा सन्मान काँग्रेस भवन येथे करण्यात आला.