पुणे-सातारा रस्त्यावरील प्रख्यात अशा शंकर महाराज मठात काही भागाचा जबरदस्तीने ताबा घेऊन राजेंद्र शिळीमकर या भाजपच्या माजी नगरसेवकाने आणि त्यांच्या साथीदारांनी दलित युवकाला जातीवरून आणि आईवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची मातंग युवकाची तक्रार आज सहकारनगर पोलीसठाण्यात दाखल झाली आहे. हा प्रकार २० जून २४ रोजी सकाळी ११ वाजता घडला, तक्रारदार यांनी ६ ऑगस्ट रोजी जबाब दिला आहे आणि आज मध्यरात्रीनंतर म्हणजे ००. ४० वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी , स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी अधिक तपास करत आहेत .अशी माहिती सहकारनगर पोलीसानी दिली आहे .
पोलिसांनी सागितले कि,’
याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या जबाबात म्हटले आहे कि,’मी चेतन प्रभाकर आरडे, वय 31 वर्षे, जात- हिंदु-मातंग, धंदा मजुरी, रा. स.नं. 65 तळजाईमाता वसाहत, सहकारनगर-1, पद्मावती, पुणे, समक्ष सहकारनगर पोलीस स्टेशन येथे हजर राहुन जबाब देतो की वर दिले पत्यावर मी माझी पत्नी, आई-वडील, भाऊ-वहिनी यांच्यासह राहणेस असुन मी पद्मावती कॉर्नर येथे चहाची टपरी चालवतो व त्यातुन मिळणा-याउत्पन्नावर उदरनिर्वाह करतो. मी लहानपणापासुन धनकवडी, सातारा रोड, पुणे येथील शंकरबाबा महारांजांचा भक्त असुन मी पुजेसाठी रोजशंकर महाराज मठात जात असतो. दि. 20/06/2024 रोजी साधारणत 11/00 वाजताच्या सुमारास मी देवदर्शन करण्यासाठी आमच्या भागातील माजी नगरसेवक श्री. महेश वाबळे यांचेसोबत शंकर महाराज मठ, धनकवडी येथे गेलो होतो. तेव्हा श्री. महेश वाबळे यांनी मला त्यांचे फोटो काढण्यास सांगितले होते. म्हणुन मी मंदिरात जात होतो. त्यावेळेस मंदिरामध्ये श्री. शंकरबाबा महाराज यांचे समाधीचे मागील बाजुस अभिषेक पुजा चालु होती. तेथे भारतीय जनता पक्षाचे खासदार श्री. मुरलीधर मोहोळ साहेब तेथे दर्शनासाठी व पुजा करण्यासाठी आले होते. त्याचवेळेस तेथे राजेंद्र आबा शिळीमकर व त्यांचे कुटुंबीय व कार्यकत्यांसह मठात आले होते. त्यावेळेस मंदिराच्या सदर खोलीच्या आतील बाजुने माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी व त्यांचा मुलगा अथर्व शिळीमकर तसेच त्यांचा भाऊ महेश शिळीमकर व त्यांचा पुतण्या अर्चित महेश शिळीमकर यांनी सदरील खोलीच्या बाहेरील बाजुने खोलीच्या दरवाज्याचा जबरदस्तीने ताबा घेतला होता व तेथे मंदिरातील पुजेच्या ठिकाणी रुद्राभिषेक पुजा चालु असलेल्या जागी मला पुजेसाठी व दर्शनासाठी जायचे असल्याने मी त्यांना मंदिराच्या आत सोडण्यास विनंती करत होतो. परंतु ते मला मंदिरातील पुजेच्या ठिकाणी जाऊ देत नव्हते, त्याचवेळेस शिळीमकर यांचे ओळखीचे सवर्ण जातीतील लोकांना मंदिरात आतील पुजेच्या ठिकाणी जाऊ देत होते. त्यावर मी त्यांना मला मंदिराच्या आतील रुद्राभिषेक पुजेच्या ठिकाणी जाऊ देण्याची विनंती केली. त्यावर अथर्व शिळीमकर व महेश शिळीमकर यांनी माझ्याशी हुज्जत घातली व त्यांच्या कार्यकत्याना सांगुन मला अश्लिल जातीवाचक शिवीगाळ केली व माझ्या जातीमुळे त्यांनी मला “पुजेच्या ठिकाणी जाऊ देणार नाही तुला काय करायचे ते कर” असे म्हणुन मला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी राजेंद्र शिळीमकर यांनी मला त्यांच्या राजकीय प्रवाहाने माझा अपमान केला व मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सदर लोक हे राजकीय व सामाजिक दृष्ट्या प्रभावशाली असल्याने त्यांच्यापुढे मला नमते घ्यावे लागले. त्याचाच गैर फायदा घेवुन काही वेळाने माजी नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर हे सदर खोलीच्या बाहेर आले. तेव्हा ते व अथर्व राजेंद्र शिळीमकर, महेश शिळीमकर व अर्चित महेश शिळीमकर यांनी मला माझ्या जातीवरुन अपमानीत करुन महारा-मांगांनी पुजेच्या ठिकाणी यायचे नाही, तुमची लायकी नाही पुजेच्या ठिकाणी यायची असे म्हणुन मला जमलेल्या लोकांसमोर व माझे मित्र नाने नयन मिसाळ, स्वप्नील आरणे यांचेसमोर जातीवाचक शिवीगाळ केली व मला मंदिरातील रुद्राभिषेक पुजेच्या ठिकाणी प्रवेश करण्यास व देवदर्शन करण्यास नकार केला. त्यावर मी त्यांना मंदिरातील पुजेच्या ठिकाणी जाऊ देण्याची विनंती केली. त्यावेळी राजेंद्र शिळीमकर मला पुन्हा अश्लिल भाषेत “XXXX(आई आणि जातीवरून शिव्या )XXXXX तुला कळत नाही का” असे बोलुन राजेंद्र शिळीमकर, अथर्व शिळीमकर, महेश शिळीमकर व अर्चित शिळीमकर यांनी मला थेट मारण्यास सुरुवात केली. महेश शिळीमकर हा त्यांच्या कार्यकत्याना आवाज देवुन म्हणाला की, “या XXXX (जातीवाचक ) मारुन टाका” असे जोरात ओरडुन कार्यकर्ते यांना मला मारण्यास सांगितले. त्यावर जमलेल्या काही लोकांनी मला मारहाण केली. त्यानंतर काही लोकांनी मला मारहाणीपासुन वाचविले व माझे प्राण वाचवले व कसेबसे मी तिथुन माझा जीव वाचवुन पळुन गेलो. माझ्यावर जीवघेणा हला होत असताना सदर ठिकाणी पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर मी खुप भयभीत अवस्थेत होतो. त्यामुळे मी माझा जीव वाचवण्यासाठी पोलीस मदत मिळण्यासाठी 11/49 वाजता 112 नंबर डायल करून मला जातीय कारणाने हल्ला केल्याची तक्रार करुन मदत मागितली. त्यांनंतर पुन्हा मी 12/20 वाजता 112 नंबरवरती मदतीसाठी कॉल केला परंतु तेव्हाही मला पोलीस मदत मिळाली नाही. तरी माझी नगरसेवक नामे श्री. राजेंद्र आबा शिळीमकर, त्यांचे बंधु श्री महेश शिळीमकर, त्यांचा पुतण्या आर्चित महेश शिळीमकर व मुलगा नामे अथर्व राजेंद्र शिळीमकर सर्व रा. संगम सोसायटी, बिबवेवाडी, पुणे -37 यांचेविरोधात अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती (आत्याचार प्रतिबंध) कायदयान्वये तक्रार आहे.