चला पुण्यातली एक महापालिकेची निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा -भाजपला संजय राऊतांचे उघड आणि जाहीर आव्हान
पुण्याच्या ससून ड्रग्स रॅकेट मध्ये एकनाथ शिंदे चे 2 सहकारी मंत्री आर्थिक हितसंबंध
पुण्याचे ड्रग्जीस्ट बँकॉक केले जातेय…
महाराष्ट्रावर घाशीराम कोतवाल आणि त्यांच्या २ डेप्युटी कोतवालांचे राज्य
खा.संजय राऊत पुण्यातून लाईव्ह.. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा
पुणे-
शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्या फडणवीसांनी 2024 नंतर आपण शिल्लक राहणार का याचा विचार करावा, अशी घणाघाती टीका करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी 2024नंतर महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली पनवती जाईल, असं टीकास्त्र सोडलं आहे. पुणे येथील महात्मा फुले मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राऊत बोलत होते.
उपस्थित शिवसैनिकांची विराट सभा हे बाळासाहेब ठाकरेचंच विराट रूप असल्याचं म्हणत संजय राऊत म्हणाले की, शिल्लक सेना काय आहे, हे पाहायचं असेल फडणवीस तर आता या. ही शिल्लक सेना एवढी मोठी असेल तर तुमच्याकडे फक्त कचराच गेलाय हे लक्षात घ्या. शिवसेना म्हणजे उसळता महासागर आहे, लाट आहे आणि त्याला कधीच ओहोटी लागत नाही. देवेंद्र फडणवीस या मैदानात आणि शिवसेना पुण्याच्या मैदानात कशी उतरली आहे, ते पाहा. येऊन पाहा ही काय शिवसेना आहे. तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणताय, पण 2024 नंतर तुम्ही शिल्लक राहणार आहात का, हा विचार करा. 2024नंतर आपण शिल्लक राहणार नाही, या महाराष्ट्रामध्ये ज्याला तुम्ही शिल्लक सेना म्हणताय ती शिवसेना आम्ही सत्तेवर आणून दाखवू. ही सभा पुण्यात होतेय. मला अनेकांनी सांगितलं की लोकं सांगतात की या मैदानावरच्या सभा यशस्वी होत नाहीत. यशस्वी होत नाहीत, ते तिथे गेलेले आहेत. आम्ही कायम यशस्वी आहोत. पाहा ना काय चित्र आहे, हे शिवसेनेचं विराट स्वरूप हे बाळासाहेबांचंच विराट रुप आहे. या सभेने एक गॅरंटी दिली आहे. मोदी खूप गॅरंटी असतात. आता ही शिवसेनेची गॅरंटी आहे. या पुण्यातून शिवसेनेचे किमान तीन आमदार जातील आणि लोकसभेचा खासदार हा भाजपचा नसेल ही आमची गॅरंटी आहे, असा ठाम निर्धारही यावेळी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासातलं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्वंही त्यांनी अधोरेखित केलं. ‘आज जे नरेंद्र मोदी तुम्हाला दिसताहेत, ती बाळासाहेब ठाकरेंची कृपा आहे. दंगलीनंतर अटल बिहारी वाजपेयी हे मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढायला निघाले होते. त्यांना राजधर्माची आठवण करून देण्यासाठी अटलजी विसरले नव्हते. पण, जेव्हा अडवाणी बाळसाहेबांना विचारण्यासाठी मुंबईला आले की, नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढावं लागेल. अख्खं जग टीका करतंय. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की, नरेंद्र मोदी गेले तर गुजरातंही गेलं. तुम्ही हे करू नका. पण आज संपूर्ण देश सांगतोय की नरेंद्र मोदी वापस आया तो पूरा देश गया. ते परत आले तर लोकशाही जाईल, स्वातंत्र्य जाईल, सर्वकाही जाईल.’ अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.

