
पुणे-एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याच्या तपासात आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी घटनास्थळावरील भौतिक पुरावे महत्त्वाचे ठरतात. याच धर्तीवर आता पुणे पोलीस दलात इन्व्हेस्टिगेटिव्ह बाईकची स्थापना करणेबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. दि.०१/०७/२०२४ पासून नवीन कायद्यांची अंमलबजावणी झाली असल्याने आयुक्तालयअंतर्गत घडणा-या सात वर्षे व त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्हे यांचे घटनास्थळी फॉरेन्सीक टिमने भेट देणे बंधनकारक केले आहे. त्याअनुषंगाने परिमंडळ निहाय ०२ आय-बाईक उपलब्ध करण्यात येणार असून सदर आय-बाईकवर ०४ पोलीस अंमलदारांची नियुक्ती करणेबाबत आदेशित करण्यात आले होते. तरी सदर आय-बाईक वर विज्ञान शाखेचे ज्ञान असलेले पोलीस अंमलदार यांना घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने भौतिक पुरावे गोळा करणे, जतन करणे व व्यवस्थित सिलबंद करून तपासी अधिकारी यांना पुढील तपासासाठी देणे याबाबतचे मूलभुत प्रशिक्षण देणेकरीता प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, गणेशखिंड, पुणे येथील रासयनिक विश्लेषक व वैज्ञानिक सहायक यांचे मार्गदर्शन मिळाले. घटनास्थळावरील पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी फॉरेन्सीक सायन्स टिमवर निर्भर राहावे लागते. या बाईकद्वारे तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याच्या दृष्टीने दुचाकींचा वापर केला जाणार आहे. यासाठी पोलीस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने भौतिक पुरावे गोळा करण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एकूण २० पोलीस अंमलदारांची परिमंडळ निहाय नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर आयुक्तालयअंतर्गत घडणाऱ्या सात वर्षे व त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्हे यांचे घटनास्थळी जाणेकरीता मुख्य नियंत्रण कक्ष गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष, पुणे शहर यांचेकडून सदर पोलीस अंमलदारांना संबंधीत गुन्ह्यांची व घटनास्थळाची माहिती/संदेश तात्काळ मिळणेकरीता. १० वॉकीटॉकी / वायरलेस संच उपलब्ध करण्यात आले आहेत. आज दि.०१/०८/२०२४ रोजी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार यांचे हस्ते फ्लॅग मार्च करून सदर पोलीस अंगलदारांना एकूण १० आय-बाईकचे वाटप करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नव्याने सुरू होणा-या आय-बाईकचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी पोलीस सह आयुक्त, पुणे शहर रंजनकुमार शर्मा तसेच अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे, कनिष्ठ तज्ञ / सपोनि (अं.मु) विनायक गायकवाड, संदीप बेले, श्री. वैभव धाडगे, श्रीमती सारिका टिळेकर, प्रमोद मेरड व आयकार युनिट, गुन्हे शाखा मदतनीस पोलीस अंमलदार निखिल घोरपडे व उत्कर्षा वाघ, छायाचित्रकार पो. हवा योगेश हिरेमठ हजर होते.