मुंबई-खासदार संजय राऊत म्हणाले की,अजित पवारांनी वेषांतर करून केलेला विमान प्रवास हा राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा प्रकार महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे. तुम्ही खोटी नावे, खोटी वेषांतर, खोटे बोर्डिंग पास, खोटी ओळखपत्र तयार करुन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवास करता. CRPF ची सुरक्षा व्यवस्था अमित शहांच्या हातात आहे. याचा अर्थ अमित शाहांनी CRPF ला यांना सोडा हे आधीच कळवले होते. दाऊद इब्राहिम, नीरव मोदी, विजय मल्या, मेहुल चौकशी, टायगर मेमन यांना सोडलंय का? हा आता चिंतनाचा विषय आहे.
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान काल काही मराठा आंदोलनकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही सगळी भाजपची कारस्थाने आहेत.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारण्याला फार मोठी परंपरा आहे. मराठी लोकं मराठी नाटक आणि रंगभूमीवर प्रेमही करतात. त्यामुळे आपले नवे बारामतीचे जे विष्णूदास आहेत. त्यांना विष्णूदास यासाठी म्हणावं लागले, कारण विष्णूचे 13 वे अवतार दिल्लीत आहेत. त्यामुळे ते विष्णूदास असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उदय सामंत यांनी राजकारणात अनेक वेळा बेईमानीचा जिहाद केला असल्याचे राऊत म्हणाले. त्याच्यावर आम्हाला एक कायदा आणावा लागेल असा टोला देखील राऊतांनी सामंतांना लगावला. तसेच यावेळी राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली. सुनिल तटकरे हा फिरता रंगमंच आहे. अजित पवारांना अडचणीत आणण्याचे काम तटकरेंनी केल्याचे राऊत म्हणाले.महिला अत्याचाराच्या मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या निवदेनाचे संजय राऊत यांनी कौकुत केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो, असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केले होते. त्यांचे हे निवेदन आवडल्याचे राऊत म्हणाले.