नदी सुधार प्रकल्प उर्मटपणे पुण्यावर लादला जातोय …पुण्यातल्या नदीत इथल्या कोणत्या महापौराची पोहण्याची तयारी आहे?
पुणे-खडकवासला धरणातून पाणी सोडवण्यात आले. त्यावेळी त्याबाबतची नागरिकांना कल्पना दिली नाही. पूराचे पाणी येत असताना वीज देखील घालवण्यात आली. लोकांचे जितके नुकसान झाले त्याप्रमाणात ते मिळणार आहे का? हा प्रश्न आहे. नदी सुधार प्रकल्प नावाखाली साबरमती प्रोजेक्ट सर्वत्र राबवला जातो आहे. गुजरातच्या आर्क्टिकेटला पुण्याची माहिती आहे का यामुळे पुण्यातील नदीचा श्वास कोंडला जातोय ?यातून मार्ग काढला पाहिजे. अशा घटना घडल्यावर राजकीय नेते येतात व जातात परंतु उपाययोजना होणे गरजेचे आहे. पुढील अॅक्शन प्लॅन असला पाहिजे, महाविकास आघाडी सरकार आले तर दोषींवर आम्ही कारवाई करु असे मत शिवसेना नेते आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ठाकरे म्हणाले, रिव्हर फ्रंट विषयात राजकारण न आणता सर्व पक्षांनी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. मुंबईत सन 2006 मध्ये मीठी नदीला पूर आले. त्या ठिकाणी सन 2007 पासून काम सुरु करण्यात आले व पाच जागी पंपींग स्टेशन करण्यात आले. पावसळयापूर्वी विविध विभागांची बैठक घेऊन ज्याठिकाणी पूर परिस्थिती जागा आहे. त्याठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहे. पुण्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पूरग्रस्त भागात उपाययोजना होणे आवश्यक आहे.
कोणीतरी पुढाकार घेऊन याबाबत तज्ञांचे मदतीने काम केले पाहिजे. नदी सुधार नावाखाली नदीचे पात्र अरुंद झाल्यानंतर पूरपरस्थिती निर्माण होते. नदी स्वच्छता प्रथम महत्वपूर्ण आहे. कोणता नगरसेवक, महापौर पुण्यातील पाण्यात उडी मारुन पोहून दाखवू शकत नाही अशी परिस्थिती असून हेच पाणी आपल्या घरात येते त्यामुळे त्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. नदी सुधार प्रकल्प हा पुणेकरांवर लादला जात असून ताे रद्द केला पाहिजे. सुरुवातीला जे प्रेझेंटेशन सादर केले ते चुकीचे होते. त्यांनी नदी अरुंद केली जाणार, झाडे कापली जाणार याबाबत कल्पना दिली नाही.

आम्ही विकासाच्या विरोधात आहोत अशी टीका होते. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र त्यातील धोके अशी समजून घेतले पाहिजे.त्यासाठी या प्रकल्पाला मी पर्यावरण मंत्री असताना स्थगिती दिली होती.साबरमती प्रकल्प चांगला झाला असेल कदाचित. पण साबरमती आणि पुण्यात फरक आहे,कंत्राटदार काम करून जातील. पूर आला तर तुम्हा आम्हाला भोगावा लागणार.नदी आधी रुंद आणि नंतर खोल करावी लागते. मात्र इथे नदी अरुंद केली जातेय आणि खोली पण कमी होत आहे.मी नुसताच पाहणी दौरा करून जाणार नाही. हा प्रश्न कसा सोडवला जाणार हे जाणून घेणारपुण्यातील नदीच्या पूररेषा बदलल्या गेल्या आहेत. नदीच्या पात्रात बिल्डरांनी बांधकाम केलय..मी यात राजकारण आणणार नाही. या प्रकल्पाचे जे आर्किटेक्ट त्यांनीच राममंदिर, सेंट्रल विस्टा चे काम केलंय. मला वाटते त्यांना दुष्काळी भागात पाठवायला पाहिजे. कारण ते जिथं जातात तिथे पूर येतो.आपण शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.आपण या नदी काठ सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली पाहिजे.
हे development नाही तर फक्त मेक अप लावणे सुरू आहे.ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या केल्या नाहीत तर या शहराचे भविष्य काय हा प्रश्न आहे.पॅरिस मध्ये नदीत महापौर पोहले. पुण्यातल्या नदीत इथल्या कोणत्याही महापौराची पोहण्याची तयारी आहे का? अशी नदीची अवस्था आहे.
