पुणे दि. २९: वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील हांडेवाडी व कोंढवा वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
हांडेवाडी वाहतूक विभागांतर्गत श्रीराम चौकाच्या २० मी. पुढे ८० मी. रुणवाल सेहगल सोसायटी व संस्कृती सोसायटीचे अलीकडे असलेल्या गतीरोधकापर्यंत रोडच्या डाव्याबाजूस ८० मी. पी-१ आणि रोडच्या उजव्याबाजूस ८० मी. पी-२ तसेच न्याती इस्टेट सोसायटी ते दिल्ली पब्लिक शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत रोडच्या डाव्याबाजूस १५० मी. पी-१ व रोडच्या उजव्या बाजूस १५० मी. पी-२ पार्किंग करण्यात येत आहे.
कोंढवा वाहतूक विभागातर्गत ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटीमधील क्रोमा टाटा एन्टरप्रायझेस ते ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मुख्य प्रवेशद्वारापर्यंत (८० मिटर) चारचाकी वाहनाकरीता पार्किंग तर ट्रिबेका हायस्ट्रीट सोसायटी मुख्य प्रवेशद्वार ते द आर्क प्रवेशद्वारापर्यंत (११५ मिटर) नो-पार्किंग करण्यात येत आहे.