Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या वारशाविषयीच्या पुस्तकाचे प्रकाशन

Date:

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना आज प्रसिद्ध विचारवंत, लेखक, अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे माजी ऱ्होड्स प्राध्यापक, सध्या भारत सरकारच्या क्षमता उभारणी  आयोगातील मानव संसाधन  सदस्य म्हणून कार्यरत असलेले डॉ. आर. बालसुब्रमण्यम् यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या वारशावरील आपले पुस्तक भेट दिले.

पॉवर विदिनः द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आढावा घेत आहे आणि पाश्चिमात्य आणि भारतीय दृष्टीकोनातून अर्थ लावत आहे, ज्यांना सार्वजनिक सेवेत जीवन व्यतित करण्याची आकांक्षा आहे त्यांना या दोन्हीद्वारे  एक मार्ग उपलब्ध करून देत आहे. 

डॉ. आर. बालसुब्रमण्यम् यांनी यापूर्वी नऊ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्यापैकी “व्हॉईसेस फ्रॉम द ग्रासरुट्स” आणि “लीडरशिप लेसन्स फॉर डेली लिव्हिंग” या पुस्तकांची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आहे. 

‘पॉवर विदिनः द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी’ हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या पद्धतीने प्रेरित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून भारताच्या नागरी विद्वत्तेचा वेध घेणाऱ्या या पुस्तकात या नेतृत्वपद्धतीचे सिंहावलोकन केले आहे.

मोदी यांचे अथक कठोर परिश्रम आणि संवादात्मक  दृष्टीकोनाने त्यांनी  पंतप्रधानपदापर्यंत केलेल्या वाटचालीवर मंत्रिमंडळातील आणि मंत्रिमंडळाबाहेरील त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकाश टाकला आहे.

विद्वत्तेचे क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र अशा क्षेत्रांसह जीवनाच्या विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत यांनी व्यक्त केलेली मते आणि रंजक किस्से यांचा देखील या पुस्तकात समावेश आहे. 

खरोखरच या पुस्तकावर  मोदी यांची आणि त्यांच्या काळातील घटनाक्रमाची छाप आहे आणि जागतिक स्तरावर भारताला मध्यवर्ती स्थान मिळवून देण्याच्या मोदी यांच्या संकल्पाला हे पुस्तक अधोरेखित करत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात भारतीय नेतृत्वाच्या विविध स्वरुपांचा अतिशय आद्य आणि सर्वाधिक प्रामाणिक दस्तावेज म्हणता येईल अशा प्रकारचे हे पुस्तक आहे, प्रत्यक्षात हे पुस्तक म्हणजे एक केस स्टडी आहे असे त्यांनी सांगितले आणि भविष्यातील संशोधकांना  संदर्भासाठी एक उपयुक्त दस्तावेज ठरेल, असे भाकित वर्तवले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांचा गौरव

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतील तिसऱ्या स्थानाबद्दल मंत्रालयात द‍िला पुरस्कार पुणे (दि...

स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा -भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

पुणे -आज पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाताना इंटरनेटच्या...

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...