पुणे-खरीप आवर्तन-१ साठी खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यात आज दि. २१/०७/२०२४ रोजी सकाळी८.०० वा. ३०० क्यूसेक्सचा विसर्ग कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थतीत व आदेशान्वये सुरू करण्यात आलाआहे.नागरिकांनी खबरदारी घ्यावी कालवात कोणी उतरू नये. असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे,कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी केले आहे.
दरम्यान आज सकाळी 8 वाजता खडकवासला धरणात 1)Khadakwasala -72.17% पाणी साठा जमा झालेला होता ,पानशेत धरणात 2)Panshet-53.07% पाणी साठा जमा झालेला होता. वरसगाव धरणात Warasgaon-40.27% एवढाच पाणी साठा जमा झालेला होता. तर टेमघर धरणात अवघा 4)Temghar- 35.32% पाणी साठा जमा झालेला होता.पुण्याला पाणी पुरविणाऱ्या या चारही धरणात मिळून 13.65TMC एवढे सध्या पाणी असून एकूण क्षमतेच्या तो46.84% एवढा पाणी साठा आहे.