स्टार भालाफेकपटू सुभेदार नीरज चोप्रा पुन्हा एकदा सर्वोच्च सन्मान मिळवण्यासाठी लढण्यास सज्ज
भारतीय तुकडीत पहिल्यांदाच लष्करी महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग; हवालदार जैस्मिन लांबोरिया आणि सीपीओ रीतीका हुडा पदक मिळवण्यासाठी देणार झुंज
मुंबई-
26 जुलै 2024 पासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी सहभागी होणाऱ्या 117 भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील 24 जवानांचा समावेश आहे. या 24 खेळाडूंमध्ये 22 पुरुष असून त्यात भालाफेकपटू सुभेदार नीरज चोप्रा यांचा समावेश आहे. याशिवाय या चमूत दोन महिला आहेत. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच लष्करी महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
2020 टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते सुभेदार नीरज चोप्रा पुन्हा सर्वोच्च सन्मानासाठी मैदानात उतरणार आहेत. 2023 मधील आशियाई क्रीडा स्पर्धा, 2023 मधील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2024 मधील डायमंड लीग आणि 2024 मधील पावो नुर्मी क्रीडा स्पर्धा या प्रत्येक स्पर्धेत चोप्रा यांनी सुवर्णपदक मिळवून असामान्य कामगिरी केली आहे. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील त्यांचा सहभाग आणखी विशेष बनला आहे.
2022 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता हवालदार जैस्मिन लॅम्बोरिया आणि 2023 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मधील कांस्यपदक विजेती सीपीओ रीतीका हुडा या दोघी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्या रुपाने सशस्त्र सेना दलातील महिला कर्मचारी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यश संपादन करून इतिहास रचणे, हेच या दोघींचे ध्येय आहे. या दोघी अनुक्रमे मुष्टीयुद्ध आणि कुस्ती या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.
सुभेदार अमित पंघल (मुष्टीयुद्ध); सीपीओ तजिंदरपाल सिंग तूर (शॉट-पुट); सुभेदार अविनाश मुकुंद साबळे (3000 मी स्टीपलचेस); सीपीओ मोहम्मद अनस याहिया, पीओ (जीडब्ल्यु) मोहम्मद अजमल, सुभेदार संतोष कुमार तमिलरासन आणि जेडब्ल्युओ मिजो चाको कुरियन (4X400M पुरुष रिले); जेडब्ल्युओ अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी); सुभेदार तरुणदीप राय आणि सुभेदार धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी) आणि नायब सुभेदार संदीप सिंग (शूटिंग) सशस्त्र सेनेतील या जवानांचा
पदक मिळवून देशाला गौरव प्राप्त करून देण्याची मनिषा बाळगणाऱ्यांमध्ये समावेश आहे. ऑलम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सशस्त्र सेनेतील खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:
क्रीडा प्रकार | रँक आणि नाव | श्रेणी |
तिरंदाजी | सुभेदार धीरज बोम्मादेवरा | रिकर्व्ह इंडियल आणि चमू |
सुभेदार तरुणदीप राय | ||
सुभेदार प्रवीण रमेश जाधव | ||
ऍथलेटिक्स | एसएसआर अक्षदीप सिंग | 20 किमी आरडब्ल्यू |
पीओ विकास सिंग. | 20 किमी आरडब्ल्यू | |
एसएसआर परमजीत बिष्ट. | 20 किमी आरडब्ल्यू | |
पीओ सूरज पंवार | चालण्याची शर्यत मिश्र मॅरेथॉन | |
सुभेदार अविनाश साबळे. | 3000 मीटर एससी | |
सुभेदार मेजर नीरज चोप्रा. | भाला फेक | |
सीपीओ तजिंदरपाल सिंग तूर. | पुरुषांचा गोळा फेक | |
जेडब्ल्युओ अब्दुल्ला अबूबकर. | पुरुषांची तिहेरी उडी | |
हवालदार सर्वेश कुशारे | पुरुषांची उंच उडी | |
सीपीओ मोहम्मद अनस याहिया. | 4X400M पुरुष रिले | |
पीओ(जीडब्ल्यु) मोहम्मद अजमल. | 4X400M पुरुष रिले | |
सुभेदार संतोष कुमार तमिलरासन | 4X400M पुरुष रिले | |
जेडब्ल्युओ मिजो चाको कुरियन | 4X400M पुरुष रिले | |
मुष्टियुद्ध | सुभेदार अमित पंघाल. | पुरुषांची फ्लायवेट |
हवालदार जैस्मिन लांबोरिया | महिलांची फेदरवेट | |
हॉकी | सीपीओ जुगराज सिंग | पुरुष हॉकी राखीव |
रोइंग | एसपीआर बलराज पंवार. | एम1एक्स (पुरुष एकेरी स्कल) |
नौकानयन | सुभेदार विष्णु सरवणन | पुरुषांची एक व्यक्ती डिंगी |
शूटिंग | नायब सुभेदार संदीप सिंग | 10 मीटर एअर रायफल |
टेनिस | नायब सुभेदार श्रीराम बालाजी | पुरुष दुहेरी |
कुस्ती | सीपीओ रितिका हुडा. | महिला 76 किलो वजनी गट (फ्रीस्टाईल) |
या 24 खेळाडूंव्यतिरिक्त पाच अधिकारी देखील ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पॅरिसला जात आहेत. त्यांचा तपशील खाली दिलेला आहे:
क्रीडा प्रकार | नाव | भूमिका |
मुष्टीयुद्ध | लेफ्टनंट कर्नल कबिलन साई अशोक | पंच |
मुष्टीयुद्ध | सुभेदार सीए कटप्पा | प्रशिक्षक |
तिरंदाजी | सुभेदार सोनम शेरिंग भुतिया. | प्रशिक्षक |
नौकानयन | हवालदार सी एस देलाई | तंत्रज्ञान अधिकारी |
नौकानयन | नायक पीव्ही शरद | फिजिओ |
पॅरिस ऑलिम्पिकमधील सशस्त्र सेना दलातील कर्मचाऱ्यांचा सहभाग संपूर्ण देशात क्रीडा जागृती वाढवत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सशस्त्र दलांची वचनबद्धता अधोरेखित करतो. या खेळाडूंच्या कामगिरीचा साक्षीदार होण्यासाठी देश सज्ज होत असतानाच देश प्रत्येक सहभागीला शुभेच्छा देत आहे आणि या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी एकजुटीने उभा आहे.