लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणेकरीता पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १९३ केंद्र सुरु करणेत आलेली आहेत. सदरील सेंटरच्या ठिकाणी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.
पुणे-राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणेसाठी आणि कुटुंबासाठी त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणेसाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना राबविणेत येत आहे.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ.) पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. १६/०७/२०२४ रोजी स्वारगेट येथील आरोग्य कोठीच्या सेंटर च्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून या संदर्भात पाहणी केली. प्रसंगी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे व श्रीमती मनीषा बिरारीस ह्याही उपस्थित होत्या.
सदर योजना राबविणेकरीता तसेच या योजनेचे अर्ज भरणेकरीता पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १९३ केंद्र सुरु करणेत आलेली आहेत. सदरील सेंटरच्या ठिकाणी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.
तसेच आज दि. १६/०७/२०२४ रोजी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभा हॉलमध्ये समाज विकास विभागाच्या सर्व समुहसंघटिकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समुहसंघटिकांना प्रशिक्षण दिले.
सदरच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेचा अर्ज भरण्यासाठी बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, NULM यांचे समुह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राधिकृत केले असून त्यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर रू.५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.