pune-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मंगळवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांनी वारी सोहळा अनुभवला.पंढरीच्या वारीचे धार्मिक पौराणिक,सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेऊन भक्ती भावाने अभ्यास पंढरीची वारी करावी असे प्रतिपादन शालाप्रमुख सौ चारुता प्रभुदेसाई यांनी प्रास्ताविकातून केले. साऊंड इंजीनियरिंग क्षेत्रात कार्य करणारे शाळेचे माजी विद्यार्थी ऋतुराज साठे यांनी याप्रसंगी अभंग गायन सेवा रुजू केली.
अभंगाला साथ टाळ चिपळ्यांची || पांडुरंग चरणी लीन वारकरी || प्रशालेतील नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विविध संत,लोक कलाकार यांची वेशभूषा करून रंगकर्मी शिक्षक श्री रवींद्र सातपुते यांच्या दिग्दर्शनाखाली साक्षात वारी सोहळा साकारला. प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी व पालक यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.
