पुणे- सकाळी सकाळी शाळेत आपल्या पाल्यांना दुचाकीवरून सोडायला जाणाऱ्या पालकांना रस्त्यातील अडथळ्यांचा सामना करता करता नाकीनऊ येऊ लागले आहेत . त्यात असे म्हणतात कि खुद्द पालकमंत्री यांच्या निकटवर्तीयात ज्यांचे नाव घेतले जाते असे एक विकसक यांच्या दिरंगाईमुळे अनेक पालक दांडेकर पुलानजीक च्या रस्त्यावरून घसरून पडत आहेत .अशा महत्वपूर्ण बाबी कडे उपमुख्यमंत्री असलेले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा लक्ष देतील काय ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. या संदर्भातील माहिती अशी कि,’दांडेकर पुलाजवळ एका एसआरएचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून तो वाहून नेताना सगळा रस्ता चिखलमय झाला आहे. हा रस्ता करणारा विकसक अजित पवार यांच्या निकटवर्तीय असल्याची यापूर्वी चर्चा होती.साने गुरूजी वसाहतीजवळ सकाळी सकाळी मुलांना शाळेत सोडवायला चाललेले अनेक पालक या चिखलात पडले. मात्र, कोणाला त्याचे पडलेले नाही. या रस्त्याच्या तिन्ही बाजुला शाळा आहेत. याशिवाय एसपी कॅालेजच्या पाठीमागील रस्ता वाहता आहे. अत्यंत वाहता असलेल्या या रस्त्यावर चिखल झाला आहे.
महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने अत्यंत बेजबाबदार असलेल्या या विकसकावर गुन्हा दाखल केला तरच इतरानां त्याचा धडा बसेल. नाहीतर ही मुजोरगिरी सुरूच राहील. एवढीच काय ती गोरगरिबाच्या सरकारकडून येथील पालकांची आणि दुचाकीस्वारांची अपेक्षा आहे.
पालकमंत्री अजितदादांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का ?
Date: