बिबट्याला प्रसंगावधानाने जेरबंद करणाऱ्या शांता शेळके यांचा महावितरणकडून सत्कार

Date:

मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले कौतुक

पुणे, दि. ११ जुलै २०२४ चांडोली (ता. राजगुरूनगर) येथे महावितरणच्या मीटर चाचणी कक्षात शिरलेल्या बिबट्याला प्रसंगावधाने जेरबंद करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचा गुरुवारी (दि. ११) मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते रास्तापेठ येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला. ‘जिगरबाज वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचे धैर्य व प्रसंगावधान अतुलनीय आहे’ अशा शब्दांत श्री. पवार यांनी कौतुक केले.

याबाबत माहिती अशी, की चांडोली (ता. राजगुरुनगर) येथे एकाच परिसरात महावितरणचे राजगुरुनगर उपविभाग कार्यालय, दोन शाखा कार्यालय, मीटर चाचणी कक्ष व भांडार कक्ष आहे. एकाच खोलीत असलेल्या मीटर चाचणी कक्षामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके बुधवारी (दि. १०) मीटर चाचणीचा अहवाल तयार करीत होत्या. सकाळी १०.४५ वाजता मीटर चाचणी कक्षाच्या दरवाजातून बिबट्याने प्रवेश केला. मात्र दरवाजासमोरच टेबलवर अहवाल लिहण्याचे काम करीत असलेल्या शेळके यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. त्याचवेळी बाहेरून एका कर्मचाऱ्याचा ‘वाघ आला’ अशी अस्पष्ट आरोळी त्यांनी ऐकली. त्यानंतर दुसऱ्याच क्षणाला टेबलच्या बाजूला मिटर बॉक्सचा आवाज झाला. त्याकडे शेळके यांनी पाहिले असता बिबट्याचे दर्शन झाले. मात्र अत्यंत धैर्याने व प्रसंगावधान राखून शांता शेळके यांनी हळूच दरवाजा गाठला व बाहेरून बंद केला. त्यानंतर पोलीस व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आले व त्यांनी बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.

‘चाचणी कक्षात मी बसलेल्या टेबलसमोरच असलेल्या दरवाजातून बिबट्या आत आला. पण कामात मग्न असल्याने माझे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. तो डाव्या बाजूने टेबलच्या एक फूट अंतरावरून गेला पण माझे दैव बलवत्तर की त्याने माझ्यावर हल्ला केला नाही. बाहेरून ‘वाघ’ असा अस्पष्ट आवाज ऐकला. त्याच क्षणी टेबलच्या बाजूला मीटर बॉक्सचा आवाज आला व तिकडे पाहिले असता बिबट्या दिसला. एक क्षण काहीच सूचले नाही. मात्र आरडाओरडा न करता क्षणार्धात दरवाजा गाठला व बिबट्याला चाचणी कक्षात बंद केले’, अशी माहिती शांता शेळके यांनी दिली.

या कामगिरीबद्दल वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचा रास्तापेठ येथील कार्यालयात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) ज्ञानदा निलेकर, कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील आदींची उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

US सिनेटमध्ये इराण युद्धाविरोधात प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

सिनेटच्या ठरावावर ट्रम्प यांची टीका; होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिप्पट,...

बरसो रे ..धरण क्षेत्रात ..मेघा..मेघा ….

पुण्यात रात्रभर ‘टिप टिप बरसा’ ; धरणांतील पाणीसाठा वाढीची...

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

सह धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश पुणे : कै. सौ. लक्ष्मीबाई...

देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा...