मुंबई-गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेले विधान परिषदेचे सभापती पदाची निवडणूक घेतली जावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यपाल रमैश बैस यांच्याकडे करण्यात आली, यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना गटनेते व आ.अजय चौधरी, शिवसेना नेते अनिल परब, आ. भास्कर जाधव, आ. रमेश कोरंगावकर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आ. भाई जगताप, आ. शशिकांत शिंदे, आ. सचिन अहिर, आ. राजेश राठोड, आ. जयंत पाटील, आ. सुनिल शिंदे, आ. ज. मो. अभ्यंकर, आ. राजेश राठोड यांची उपस्थिती होती.
गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेले विधान परिषदेचे सभापती पदाची निवडणूक घेतली जावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यपाल रमैश बैस यांच्याकडे करण्यात आली, यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना गटनेते व आ.अजय चौधरी, शिवसेना नेते अनिल परब, आ. भास्कर जाधव, आ. रमेश कोरंगावकर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आ. भाई जगताप, आ. शशिकांत शिंदे, आ. सचिन अहिर, आ. राजेश राठोड, आ. जयंत पाटील, आ. सुनिल शिंदे, आ. ज. मो. अभ्यंकर, आ. राजेश राठोड यांची उपस्थिती होती.विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयी सविनय निवेदन करण्यात येते की, विधानपरिषद हे वरीष्ठ सभागृह काही राज्यात अस्तिवात असून त्याद्वारे राज्य कारभार व विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारे महामहीम राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी, विधानसभा सदस्यांचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर आणि शिक्षक यांचे प्रतिनिधी यासारख्या सर्व क्षेत्रातील तज्ञांचे मिळून बनविले जाते हे आपण जाणताच.
जनतेच्या कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विधानपरिषद आणि विधानसभेची अधिवेशने घेवून मा. सभापती व मा. अध्यक्ष हे आपले प्रतिनिधी म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद हे विधानमंडळातील सर्वोच्य असून गत 2 वर्ष 6 महिन्यापासून हे पद रिक्त असल्याने लोकशाही तत्य जपणारे वरीष्ठ सभागृह है विना नेतृत्व चालू असल्याची आमची भावना झालेली आहे.
सद्यस्थितीत 14 व्या महाराष्ट्र विधासभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. पर्यायाने विधानपरिषदेच या शासन कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असेल मा. सभापतीचे संविधानिक पद अनेक वर्ष रिक्त ठेवणे विधीमंडळाच्या प्रथा परंपरेच्या विरुध्द व लोकशाहीस पातक असल्याचे आमचे मत आहे. सभागृहाचे पक्षीय बलाबल पाहता सरकार पक्षाचे संख्याबळ अधिक असून मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद हे पद तात्विकदृष्टया सरकार पक्षाकडेच जाण्याची अधिक शक्यता आहे.
महामहीम महोदय, उक्त परिस्थिती विचारात घेता आणि विधानपरिषद सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे व पारदर्शकपणे चालवण्यासाठी या सभागृहाची निकड पाहता महाराष्ट्र विधानांरषद नियम 6 (1) नुसार मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांची निवडणूक घेण्यासाठी याब अधिधशन कालावधीत दिनांक निश्चित करण्यात यावा, अशी विनंती विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी निवेदनात केली.