मुंबई- सत्ताधारी पक्षातील भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. या भेटीत सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे येत्या काळात याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टवर सांगितले की, राज्यपाल महोदयांची भेट घेतली आहे. यात प्रामुख्याने वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.
सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल रमेश बैस काय निर्णय घेणार ?
Date: