पुणे-
टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेतून छोट्या वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली.
सर्व विद्यार्थी पारंपरिक संतांच्या वेशभूषेमधे आले होते. मुलांनी तुळशी वृंदावन, पालख्या करून आणल्या होत्या. यावर्षी आकर्षण म्हणजे काही दिंडीप्रमुखांना आमंत्रित केले होते. मुलांनी शारीरिक स्वच्छतेसाठी लागणाऱ्या जरुरीच्या वस्तू जसे साबण, टुथब्रश आणि टूथपेस्ट, केसांसाठी तेल, शाम्पू, कंगवा इत्यादी सामान वारकऱ्यांना सदिच्छा भेट दिले. शाळा अभंगाच्या सूरांनी भरली होती. दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. छोट्या वारकरींची दिंडी विठुच्या नामघोषात शाळेजवळील विट्ठल मंदिरात गेल्या. परत शाळेत आल्यावर दिंडी प्रमुखांसह अभंग गायले. त्यांना सर्व भेटवस्तु देण्यात आल्या. पाठोपाठ प्रसाद वाटप झाले. हा सोहोळा मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून पार पडला.