Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सन मराठी वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण!

Date:

सत्या आणि मंजू एकत्र करणार वटपौर्णिमेच्या विधी पूर्ण

सन मराठी या वाहिनीवरील प्रत्येक मालिकेचे हटके विषय आहेत. सन मराठीवरील अर्थपूर्ण मालिकांना एक विशेष महत्व आहे. त्यात सन मराठीवरील सर्वांची लाडकी कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे. या वटपौर्णिमेला कॉन्स्टेबल मंजू मालिकेतील प्रमुख पात्रांचा विशेष व रोमांचक प्रवास घराघरात पोहोचणार आहे.

वटपौर्णिमा हा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि प्रेमाचे नवीन रंग घेऊन येतो. ह्या व्रतामध्ये पती-पत्नीच्या अतूट नात्याचे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी साथ देण्याचे वचन असते. अशा या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी, सत्या आणि मंजूच्या प्रेमाची नवीन परिभाषा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सत्या आणि मंजूचं नुकतच लग्न झालंय त्यात सत्या आणि मंजूला हे लग्न मान्य नाहीये परंतु ऑन ड्युटीवर असलेल्या मंजूला वटपौर्णिमेचा शुभ दिवस खरंतर खूप चॅलेंजिंग असणार आहे. पोलिस बंदोबस्तासाठी उभी असणारी मंजू हिला तात्या साहेब हे त्यांच्या राजकारणी फायद्यासाठी वटपौर्णिमेच्या विधी पूर्ण करायला भाग पाडतात, नेहमी स्त्रियाच हे वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण करतात मग पुरुष हे व्रत पूर्ण का नाही करू शकत असे तात्या साहेब ऑन ड्युटीवर असलेल्या मंजुला सांगतात.
वटपौर्णिमेचा हा खास दिवस महिलांसाठी खूप आवडीचा असतो या दिवशी स्त्रिया नवीन साडी परिधान करून, नटून थटून वडाची पूजा करतात, परंतु आपली मंजू ही पोलिसांच्या गणवेशातच ही विधी पूर्ण करणार आहे.
यावेळी इथे आपल्याला सत्याची देखील एन्ट्री पाहायला मिळणार आहे.
सत्या आणि मंजू हे दोघे एकत्र येऊन वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण करणार आहेत.सत्या आणि मंजू या दोघांच्याही मनात नसताना हे व्रत त्यांना पूर्ण करावं लागणार आहे. आता नियतीचा हा खेळ सत्या व मंजुच्या आयुष्यात कोणत्या नवीन अडचणी निर्माण करणार की वटपौर्णिमेचा ह्या खास दिवशी दोघांच्या नात्यात प्रेमाची उधळण होणार,हे आपल्याला येत्या 21 जून ला सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...