पुणे- शहरातले प्रदूषण हे बांधकामे आणि वाहतुकीने होत असल्याचा स्पष्ट दावे केले जात आहेत.माझे शहर सुंदर शहर अशा घोषणा देत शहरातील झोपडपट्टी निर्मूलनाचा कार्यक्रम वर्षानुवर्षे राबविला जातोय.त्यासाठी महापालिकेनंतर स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण देखील केले गेले मात्र अद्यापही झोपडपट्ट्या मात्र नाहीश्या होत नाहीत असे चित्र असताना या प्राधिकरणाचा कारभारच गोलमाल कारभार आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत याच पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी या प्रकरणात एका नव्या ‘गोलमाल ‘प्रवृत्तीवर आसूड ओढले आहेत आणि हा ५० हजार कोटीचा घोटाळा तर नाही ना ? असा प्रश्न थेट महापालिका प्रशासनाला केला आहे.
या संदर्भात केसकर यांनी महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिले आहे यात असे म्हटले आहेकी,’
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्राधिकरण न राहता फक्त पुणे शहरातील जुने वाडे आणि इमारती यांच्या पुनर्वसनासाठी पुनर्विरमानासाठी बनलेले प्राधिकरण आहे.झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय वॉर्ड ऑफिसर च्या माध्यमातून त्यांच्या अभियंत्याकडनं घेतात आणि जुने वाडे हे झोपडपट्टी सदृश असल्याचे जाहीर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करतात.यामध्ये पुणे महानगरपालिकेचे नुकसान आहे.पुणे मनपाला विकास शुल्क मिळत नाही.
विकासकाला शुल्क भरावे लागत नाही आणि टीडीआर विकून करोडो रुपये मिळतात त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वार्ड रचनेतील अभियंत्यांना हाताशी धरून हे सगळे षडयंत्र चालू आहे.पुणे महानगरपालिकेच्या पेठांच्या मध्ये जवळपास 20 हजार वाडे आहेत त्यांचा विचार केला तर हा 50 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा आहे.आमची महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे आपल्या परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय देऊ नये हा अभिप्राय देण्याचा दर किमान 30 लाख रुपये असल्याचे कळते.आपण याबाबत त्वरित योग्य पावले उचलून हे अभिप्राय देणे थांबवावे आपल्या किंवा नगर अभियंत्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने कुठलाही अभिप्राय देऊ नये असे आदेश निगरमित त्वरित करावेत ही हात जोडून विनंती आहे. असे केसकर यांनी म्हटले आहे.