पुणे दि. १८ :महापालिकेच्या भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे (वय ५३) यांचे मंगळवारी दुपारी तीन वाजता हर्षदा शिंदे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व एक मुलगा असा परिवार आहे.
शिंदे यांनी तत्कालीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्या महापालिकेच्या सेवेत
रुजू झाल्या होत्या. त्यांनी बांधकाम विभागामध्ये विकास आराखडा, पाणीपुरवठा विभागात वितरण प्रकल्पामध्ये काम केले होते.
मागील सात महिन्यांपासून शिंदे कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी पुन्हा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. औंधमधील स्मशानभूमीत बुधवारी (ता. १९) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.