पुणे- शहरातील पेठे ज्वेर्लसच्या मालकांनी एका व्यवसायिकाकडून डायमंडचे नेकलेस व बांगडया देण्यासाठी 60 लाख रुपये घेतले. परंतु व्यवसायिकाला सदर रकमेचे दागिने न दिल्याने, व्यवसायिकाने पेठे ज्वेलर्सचे मालकांकडे परत पैसे देण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांना दहा लाख रुपये परत देण्यात आले परंतु ऊर्वरित 50 लाख रुपये परत न देता सदर रकमेची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी पेठे ज्वेर्लसच्या मालकांवर काेथरुड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग चंद्रकांत पेठे व तनय पराग पेठे (रा.कर्वेनगर,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याबाबत देवेंद्र विनाेदचंद्र शहा (वय-49,रा.पर्वती दर्शन,पुणे) यांनी पोलिसांकडे आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार हा सन 2017 ते 17 जून 2024 यादरम्यान आयडीयल काॅलनी, पेठे ज्वेर्लस याठिकाणी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार देवेंद्र शहा यांना आराेपी पेठे ज्वेर्लसचे मालक पराग पेठे व तनय पेठे यांनी कमी किंमतीत डायमंडचा नेकलेस व डायमंड बांगडया देण्याचे अमिष दाखवले. तक्रारदार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्याप्रमाणे राेख 25 लाख रुपये राेख व आरटीजीएसद्वारे 35 लाख रुपये असे एकूण 60 लाख रुपये पेठे यांना दिले. याबाबत सदर दाेघात लेखी करार देखील स्टॅम्प पेपरवर झाला हाेता. परंतु पैसे मिळाल्यानंतर पेठे यांनी ठरल्यानुसार दागिने न देता सदर रक्कम स्वत:कडेच ठेऊन घेतली. त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी पेठे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता, ते वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ करत हाेते. शाह यांनी सतत पैसे मागण्याकरिता तगादा लावल्याने अखेर पेठे यांनी दहा लाख रुपये परत त्यांना दिले. परंतु उर्वरित 50 लाख रुपये पुन्हा पुन्हा परत मागून देखील परत न केल्याने याबाबत शाह यांनी पेठे यांच्या विराेधात काेथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पुढील तपास काेथरुड पोलिस करत आहे.