Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

घरातच वीजेचा शाॅक लागून पती पत्नी मुलाचा एकाचवेळी मृत्यु

Date:

पुणे-अंघोळ केल्यानंतर टाॅवेल वाळत घालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला वीजेचा शाॅक लागला. त्यामुळे त्यास वाचविण्यासाठी त्यांची पत्नी धावपळीत जाऊन तिने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे नादात तिला देखील वीजेचा शाॅक लागला. यादरम्यान, आई वडील दाेघांना वीजेचा शाॅक बसत असल्याचे पाहून त्यांच्या बचावासाठी गेलेल्या मुलास देखील वीजेचा शाॅक लागून तीघांचा एकचवेळी दुर्देवीरित्या मृत्यु झाल्याची घटना दाैंड तालुक्यातील दापाेडी या ठिकाणी घडली अाहे.

सुरेंद्र देविदास भालेकर (वय-४४), पत्नी अदिका सुरेंद्र भालेकर (३८) व प्रसाद सुरेंद्र भालेकर (१७) अशी या घटनेत मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत . भालेकर कुटुंब मुळचे साेलापूर येथील रहिवासी असून ते कामाच्या निमित्ताने दाैंड तालुक्यात दापाेडी येथे अडसूळ नावाच्या व्यक्तीचे खाेलीत भाडयाने राहत हाेते. संबंधित त्यांची राहती खाेली ही पत्र्याची असून त्यांच्या खाेली शेजारीच वीजेचा खांब आहे . सुरेंद्र भालेकर हे साेमवारी सकाळी अंघोळ करुन ओला झालेला टाॅवेल वाळत टाकण्यासाठी घराजवळील तारेपाशी गेले हाेते. त्यावेळी त्यांच्या घरात वीज पुरवठा केलेली एक वायर पत्र्यावर टाकलेली हाेती. वाऱ्याने सदर वायर हलून त्याचेवरील आवरण निघून गेल्याने वायर मधील वीजप्रवाह हा जवळच्या तारेत देखील उतरला हाेता. याच तारेवर सुरेंद्र भालेकर टाॅवेल वाळत टाकण्यासाठी गेले असताना त्यांना जाेरात वीजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केली. त्यामुळे त्यांची पत्नी अदिका त्यांना वाचविण्यासाठी धावत आली व तिला देखील वीजेचा धक्का बसला. आई वडीलांना याचवेळी ओढण्याचा प्रयत्न करत असताना मुलगा प्रसाद यास देखील विजेचा धक्का लागून त्याचा देखील दुर्देवी मृत्यु झाला.

या घटनेवेळी सुदैवाने भालेकर यांची मुलगी क्लाससाठी गेल्याने व दुसरा एक मुलगा गावी गेला असल्यान या अपघातातून बचावले गेले अाहे. सुरेंद्र भालेकर हे बांधकामासाठी सेट्रिंगची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत हाेते. त्यांची पत्नी शेतात मजुरीचे काम करत हाेती तर मुलगा प्रसाद हा १२ वी मध्ये शिक्षण घेत हाेता. एकाचवेळी कुटुंबातील तीनजणांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात अाहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर, महावितरणचे कर्मचारी व पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. पाेलीसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा -भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

पुणे -आज पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाताना इंटरनेटच्या...

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...