Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यात महिलेला ठाण्यातच मारहाण, PSI सह ९ जणांवर गुन्हा दाखल

Date:

पुणे : बलात्काराची तक्रार द्यायला आलेल्या महिलेला पोलिस ठाण्यातच उपनिरीक्षक, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोकशाही या वृत्तवाहिनीने यात भाजपच्या स्थानिक एका बड्या नेत्याच्या नावाचा उल्लेख केल्याने या वृत्ताचे व्हिडीओ व्हायरल होत आहे .

या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर, हवालदार नीलम कर्पे, माया गाडेकर, योगिता आफळे, दोन महिला पोलिस शिपाई, तसेच पीडितेचा नवरा अक्षय जीवन आवटे (३१, रा.सोमवार पेठ), आदित्य गौतम (३०, रा.साततौटी चौक, कसबा पेठ) आणि सुजीत पुजारी (रा.आंबेगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, उपनिरीक्षकासह अन्य आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिलेने बलात्कारप्रकरणी आरोपी सुजीत पुजारी, आदित्य गौतम यांच्याविरुद्ध मार्च २०२३ मध्ये तक्रार दिली होती. पती अक्षय आवटे याने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आराेप तिने केला होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी पुजारी, गौतम, आवटे यांच्याविरुद्ध बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडे तक्रार दिल्याने आरोपी चिडले होते. २३ मार्च २०२३ रोजी महिलेला समर्थ पोलिस ठाण्यात बोलावले होते.

पती अक्षय, त्याचे मित्र पुजारी आणि गौतम यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. समर्थ पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याने पीडितेला पोलिस ठाण्यात बोलविले. तेथे उपनिरीक्षक आणि महिला कर्मचाऱ्यांनी पट्ट्याने मारहाण केली, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे.आरोपी पुजारी आणि गौतम भारतीय जनता पक्षाच्या एका माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मला धमकावले. माझ्याकडे पाहून ते थुंकले, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...