पुणे-येथील फरासखाना पोलिसांनी एका मोबाईल चोरट्याला पकडून त्याच्या कडून तब्ब्ल ५५ मोबाईल आणि १ लॅपटॉप हस्तगत केला आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १०/०६/२०२४ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन अंकित गाडीतळ पोलीस चौकी येथील पो. अमंलदार अकबर कुरणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली आहे. की रेल्वे भरावाजवळ, शाहीर अमर शेख चौकातील सिग्नलजवळ, मंगळवार पेठ, पुणे येथे एक छत्री व पेन विकाणारा इसम वय अंदाजे ३० वर्ष, याचेकडे भरपुर मोबाईल फोन आहेत अशी बातमी मिळली.सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन सपोनि गायकवाड व स्टाफ असे शाहीर अमर शेख चौक, रेल्वे भराव जवळ, मंगळवार पेठ, येथे गेले असता तेथे बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव संतराम सुग्रीव खलदी, वय ३० वर्ष, रा. खाल्दी, तहसिल किसनगंज, जि. वारा, राज्य राजस्थान. असे असल्याचे सांगितले त्याचे हातामध्ये एक मोबाईल फोन होता त्या मोबाईल फोन बाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याच्यावरील संशय वाढल्याने सदर इसम रहात असलेल्या फुटपाथवरील बॅगेची तपासणी करता त्यामध्ये एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, ४९ एन्ड्रॉईड मोबाईल फोन, ०५ साधे किपॅड असलेले विविध कंपन्यांचे फोन व त्याचे कडे असलेल्या एकुण ५५ मोबाईल फोन त्यांची एकुण किंमत ६,२०,०००/-रू. अंदाजे असलेले जप्त करण्यात आले आहेत.
सदरचे मोबाईल फोन हे त्याने पुणे शहरातुन विविध ठिकाणाहुन चोरी केले असलेबाबत माहिती मिळाली असुन त्याचे इतर साथिदारांचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त परि-१ संदीपसिंग गिल्ल, सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग मच्छिंद्र खाडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहा. पोलीस निरिक्षक वैभव गायकवाड, सपोफौ. प्रशांत शिंदे, पोलीस अंमलदार गुरव, अकबर कुरणे, बनकर, सुर्वे यांनी केली आहे.