नाल्यावर बांधलेल्या नटराज सोसायटीसह गुरुराज आणि अन्य पूरग्रस्त भागांना माधुरी मिसाळांनी दिली भेट
पुणे- चव्हाण नगर, नटराज सोसायटी, बागुल उद्यान,गुरुराज सोसायटी,महेश सोसा. चौक , महेश सोसा. गॅस गोडाऊन आदि पूरप्रवण भागाला आमदार माधुरी मिसाळ यांनी अधिकार्यांना सोबत घेऊन भेटी दिल्या आणि नंतर आयुक्तांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली . दरवर्षी सातत्याने येणारा पूर हि परिस्थिती काही चांगली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.मात्र पुणे पाण्यात जाण्यास महापालिकाच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . महापालिकेचे अधिकारी खोटे बोलतात . मी १०० फेऱ्या महापालिकेत घातल्या , राज्य सरकारने २०० कोटी दिले तरीही अधिकाऱ्यांनी कामे केली नाहीत असा आरोप त्यांनी केला .पुण्यातील भयाण स्थिती निर्माण करून पुणेकरांचा जीव अधिकारीच धोक्यात घालत आहेत असे त्या म्हणाल्या .
पहा त्यांच्या भेटी आणि त्यांचे स्पष्टीकरण –
चव्हाण नगर, नटराज सोसायटी, बागुल उद्यान परवा झालेल्या पावसामुळे प्रभाग क्र. ३५ मधील चव्हाण नगर परिसराततील डोंगरी भाग खचला असून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, तसेच नटराज सोसायटी परिसरा लगद असणाऱ्या ओढ्याची सीमा भिंत ढासळून ओढ्याचे पाणी सोसायटी पार्किंग व नागरिकांच्या घरात जाऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर बागुल उद्यानापासून जाणाऱ्या ओढ्यावर बागेचा विस्तार झाल्यामुळे ओढ्याचे पात्र कमी झाले असून पावसामध्ये या ठिकाणी पाणी पात्र सोडून बाहेर येऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्या अनुषंगाने या दोन्ही ठिकाणची पाहणी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या समवेत करून. नागरिकांसोबत या संदर्भात संवाद साधत जलद रित्या उपाययोजना पालिका प्रशासनाने कराव्यात याबाबत पालिका प्रशासनास सूचना केली. यावेळी भागातील स्थानिक नागरिक, माजी नगरसेविका मानसी देशपांडे, माजी नगरसेवक महेश वाबळे, भाजपा पर्वती विधानसभा अध्यक्ष प्रशांत दिवेकर, सरचिटणीस राजू कदम, अजय भोकरे, प्रशांत थोपटे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-आमदार माधुरी सतीश मिसाळ
गुरुराज सोसायटी
परवा झालेल्या पावसामुळे प्रभाग क्र. ३६ मधील गुरूराज सोसायटी परिसरा लगत असणाऱ्या ओढ्याची सीमा भिंत ढासळून ती ओढ्यामध्ये पडली व ओढ्याचे वाढलेले सांडपाणी सोसायटी परिसरात शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला व तिथे असणारे झाड देखील वाऱ्यामुळे पडले. या संदर्भात पाहणी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. व महानगरपालिकेचे अधिकारी सोबत होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या व या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात पालिका प्रशासनास सूचना दिल्या. यावेळी या भागातील स्थानिक नागरिक, माजी नगरसेविका मानसी देशपांडे, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश वाबळे भाजपा पर्वती विधानसभा अध्यक्ष प्रशांत दिवेकर, सरचिटणीस राजू कदम, अजय भोकरे, प्रशांत थोपटे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.--आमदार माधुरी सतीश मिसाळ
महेश सोसा. चौक , महेश सोसा. गॅस गोडाऊन प्रभाग क्र. ३७ मधील महेश सोसायटी चौक व महेश सोसायटी गॅस गोडाऊन येथे परवा झालेल्या पावसामुळे पाणी तुंबून सर्व वाहतूक विस्कळीत झाली, त्याचबरोबर सोसायटी भागात तळमजल्याला पूर्ण पाणी साचून राहिले यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला, याकरिता पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज बी.पी. व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली, याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात स्थानिक नागरिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून त्याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश दिले. यावेळी या भागातील स्थानिक नागरिक, माजी नगरसेविका मानसी देशपांडे, रूपाली धाडवे, भीमराव साठे, भाजपा पर्वती विधानसभा अध्यक्ष प्रशांत दिवेकर, सरचिटणीस राजू कदम, अजय भोकरे, प्रशांत थोपटे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.--आमदार माधुरी सतीश मिसाळ
पर्वती मतदार संघातील विविध कामासंदर्भात महानगरपालिका आयुक्ता सोबत चर्चा-परवा झालेल्या पावसामध्ये मतदारसंघातील विविध ठिकाणी पावसाचे पाणी तुंबुन राहिले यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले व नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, अनेकदा सूचना करूनही महानगरपालिका प्रशासनाने कामे केली नाहीत यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेऊन, या बैठकीमध्ये लवकरात लवकर समस्यांच्या उपाययोजना सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्या.या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महानगरपालिकेचे अधिकारी रवींद्र बिनवडे, बी पृथ्वीराज तसेच पर्वती मतदारसंघातील नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.बैठक पार पडल्यानंतर बैठकीतील प्रमुख विषयांसदर्भात पत्रकारांसमवेत संवाद साधला--आमदार माधुरी सतीश मिसाळ