अजूनही रसिक जुन्या सिनेमांच्या ,संगीताच्या जमान्यातच रमतो , जुन्या सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरावा अशी आपली इछ्या आहेच त्याक बरोबर करण जोहर आणि आता UKP द्वारा वादळातील नौकेला दिशा देणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे समाजाला योग्य दिशा देणारे ,चित्रपट निर्माण होवोत अशी सदिछ्या व्यक्त करत माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे यांनी उषा काकडे प्रोडक्शनला शुभेछ्या दिल्या .
- ‘विकी’ या पहिल्या मराठी चित्रपटाचीही घोषणा; चित्रपट सृष्टीतील दिग्गजांकडून उषा काकडे यांचे निर्मिती क्षेत्रातील पदापर्णाबद्दल कौतुक
पुणे : बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कारकीर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांच्या ‘उषा काकडे प्रॉडक्शन्स’च्या अप्रतिम लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले. या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रॉडक्शन निर्मित ‘विकी : द फुल ऑफ लव्ह’ या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते क्लॅपिंग करून झाली.
मुंबईतील ताज लँड्स एंड येथे सोमवारी झालेल्या या तारांकित सोहळ्यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, उद्योजक,आणि माजी खासदार संजय काकडे,अभिनेत्री इशा कोप्पीकर, सोनाली कुलकर्णी, रिंकू राजगुरू, स्मिता गोंदकर, तनिषा मुखर्जी, गौहर खान, कोरियोग्राफर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, अभिनेता अभिजीत खांडकेकर, , निर्माती उषा काकडे, ‘विकी’ चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ, कलाकार हेमल इंगळे व अभिनेता सुमेध मुद्गळकर, अशोक पंडित यांच्यासह हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती.
करण जोहर म्हणाले, “चित्रपट निर्मिती सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात उषा काकडे यांचे स्वागत व अभिनंदन करतो. उषा काकडे यांना नेहमीच पाठिंबा राहील. त्यांच्याकडून अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती नक्की होईल. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचे नाव विकी असून, हे नाव अनेकांसाठी नशीब घडवणारे ठरते. मराठी चित्रपटांचा मी मोठा फॅन आहे. त्यामुळे अशा या मोठ्या बॅनरखाली होत असलेल्या मराठी चित्रपटाचे क्लॅपिंग माझ्या हस्ते होत आहे, याचा मोठा आनंद आहे. मराठी चित्रपट महाराष्ट्रासोबतच जगभरात नावलौकिक मिळवत आहेत. महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत राहत असल्याचा मला अभिमान वाटतो.”
मनीष मल्होत्रा यांनी काकडे यांच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक केले. बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिलेल्या उषा काकडे निर्मिती क्षेत्रातही आपला ठसा निश्चितपणे उमटवतील. अनेकांची मने जिंकण्याचा उषा काकडे यांचा प्रवास सुरु झाला आहे.”
उषा काकडे म्हणाल्या, “आज या आनंदाच्या क्षणी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करते. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याचे स्वप्न खूप आधीपासून पाहिले होते. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना आपल्याला जर अनेक लोकांपर्यंत योग्य मेसेज पोहोचवायचा असेल, तर चित्रपट हा एक उत्तम पर्याय आहे. माझ्या या नवीन प्रवासात माझ्या जवळचे स्नेही मला खूप प्रेम व शुभेच्छा देत आहेत, याचा मला आनंद आहे. करण जोहर आणि मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते या प्रॉडक्शन हाऊसचा शुभारंभ होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. अनेक नवनवीन समाजोपयोगी संदेश देणारे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश राहील. ‘विकी : द फुल्ल ऑफ लव्ह’ असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
बांधकाम क्षेत्रात गेल्या १८ वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असलेल्या उषा काकडे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्याही संस्थापक आहेत. आजवर फाउंडेशनच्या माध्यमातून ५ लाख मुलांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाचे ज्ञान दिले आहे. तसेच ८० हजार मुलांची मोफत दंततपासणी, १ लाख १० हजार मुलांचे डोळे तपासणी व शस्त्रक्रिया फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर करण्यात आले आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी युनिसेफ संस्थेसोबत भागीदारी करण्यात आलेली आहे.
चित्रपटांमध्ये परिवर्तनाची शक्ती लक्षात घेऊन उषा काकडे यांनी गेली ३ वर्षे चित्रपट क्षेत्राचा सखोल अभ्यास केला व त्यानंतर या क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण करण्याचे निश्चित केले. त्यांचे हे पाऊल त्यांच्यातील समर्पणाचे प्रतीक आहे. येत्या काळात अनेक चांगल्या कथा स्क्रीनवर आणण्यात त्यांचे योगदान राहील. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो मुलांना शिक्षण व आरोग्य सक्षम होण्यासाठी लाभ झाला आहे. तसाच या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा लाभ समाजहितासाठी होईल.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “उषा काकडे यांचे कार्य सर्व क्षेत्रात उत्तम आहे. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम यशाचे शिखर गाठले आहे. चित्रपटसृष्टीत देखील त्या यशाचे शिखर नक्कीच गाठतील. या क्षेत्रात करण जोहर यांच्यासारख्या निर्मात्यांचे त्यांना मार्गदर्शन लाभल्याने त्यांचे सर्व चित्रपट सुपरडुपर हिट होणार यात शंकाच नाही.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर यांनी केले.
Special Interview With Usha Kakade, Sumedh Mudgalkar & Heymal Ingley For Their Marathi Film “Viki” Under The Banner of “Usha Kakade Production | SBB
saasbahuaurbetiyaan #atsbb #sumedhmudgalkar #heymal #ushakakadeproduction
#ukpproduction #ushakakade #SanjayKakade #KaranJohar#live#mumbai#bollywood#bollywoodnews