पुणे- माणसाचा संसार माणसाला नेहमीच प्रिय असलेली बाब ठरला आहे. संसारासाठी प्रगती साठी तो विकवीकी करून बाणेरला आला अन … मग बाणेरच्या एकाने त्याच्या संसाराला दृष्ट लावली विस्कळीत केला ,अन एक दिवस त्याचे आयुष्यच पालटले .. आयताच त्याला नाना चादर एकटा सापडला आणित्याच्या डोक्यात मोठा दगड घालून तीने त्याचा कायमचा खात्मा केला. हि कहाणी नाही तर हकीकत आहे चतुर्श्रुंगी पोलिसांच्या तपा स कथेतून उलगडलेली .. पोलिसांनी पोलिसांच्या भाषेत सांगितले माहिती अशी कि,’
चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.५०९/२०२४ भा.द.वि. कलम ३०२ मधील फिर्यादी वय ३४ वर्षे रा.दादा कलाटे यांची चाळ, वाकड गावठाण वाकड पुणे यांनी फिर्याद दिली की, त्यांचा भाऊ नामे नाना विठ्ठल चादर वय ३६ वर्षे रा. सदर यास दिनांक ०७/०६/२०२४ रोजी ते दिनांक ०९/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा.चे दरम्यान सर्व्हेनं. २७/४ रामदास धनकुडे यांचे मोकळया जागेत, पॅनकार्ड क्लब रोड, धनकुडे वस्ती बाणेर पुणे येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्याचे डोक्यात काहीतरी जड वस्तु मारुन त्याचा खुन केला आहे म्हणुन तक्रार दिल्याने वरिल प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे- २, पुणे शहर श्री, सतिश गोवेकर यांनी दाखल गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून दाखल गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ४ कडील सर्व अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करणेत आली. दाखल गुन्हयाच्या तपासकामी नेमण्यात आलेल्या पथकांनी दाखल गुन्हा हा आरोपी नामे कृष्णा सुरोशे याने केला असून तो सध्या त्याचा मोबाईल फोन बंद करुन अंबरनाथ जि.ठाणे, येथे पळुन गेला असले बाबत गोपनीय माहीती प्राप्त केली.
संशईत आरोपी कृष्णा सुरोशे याचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रीक विश्लेषणा वरुन तो फॉरेस्ट नाका, अंबरनाथ, जि. ठाणे येथे असल्याचे निश्चित झाले. आरोपीस ताब्यात घेण्या करीता दोन पथके तयार करुन अंबरनाथ येथे दाखल झालेल्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने संशईत आरोपी यास फॉरेस्ट नाका, अंबरनाथ जि.ठाणे येथुन दि.१०/०६/२०२४ रोजी पहाटे ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव कृष्णा भिमराव सुरोशे वय ४० वर्षे, रा. पाण्याच्या टाकीजवळ, विठ्ठल रखुमाई मंदीराच्या शेजारी, बालेवाडी गावठांण, पुणे, मुळगांव आनंदवाडी, ता. परतुर, जि. जालना असे असल्याचे सांगितले.
दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने कौशल्यपुर्ण तपास करता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल करुन सांगीतले की सन २०१६ मध्ये फॉरेस्ट नाका, अंबरनाथ, ठाणे येथिल त्याच्या मालकिचे घर व तिन रिक्षा विकुन मुरकुटेचाळ, बाणेर, पुणे येथे नोकरी निमित्त कायम स्वरुपी पत्नी व मुले यांचेसह राहण्यास आला. आरोपीचे घरा शेजारी राहण्यास असलेला नाना विठ्ठल चादर याचेशी आरोपीची मैत्री झाली. काही दिवसानंतर आरोपीची पत्नीव नाना चादर यांचे मध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीचे मनामध्ये आला. तेव्हा पासुन आरोपी व त्याचे पत्नीत सदर कारणावरुन वारंवार वाद होत होते. नाना चादरमुळे आरोपीचा संसार विस्कळीत झाल्याने आरोपीचे मनामध्ये त्याच्या विषयी नेहमीच राग होता.
दि.०७/०६/२०२४ रोजी आरोपी, मयत नाना चादर व त्याचे मित्र असे रामदास धनकुडे यांचे मोकळया जागेत जावुन ताडी, दारु व चिलीम पित बसले होते. त्या नंतर ते आपापले घरी निघुन गेले.दि.०८/०६/२०२४ रोजी पहाटे ०५/०० वा. चे सुमारास आरोपीस चिलीम पिण्याची तलप झाल्याने मोटार सायकल घेवून पहाटे ०५/३० वा.चे सुमारास ताडी पिण्यासाठी बसलेल्या ठिकाणी पोहोचला. तेव्हा नाना चादर हा एकटाच दारुच्या नशेत तेथे झोपलेला दिसला आरोपीने कोणताही विचार न करता तेथे पडलेला मोठा दगड घेवून नाना चादर याचे डोक्यात घातला व तेथुन दुसऱ्या दिवशी अंबरनाथ येथे निघुन गेला.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, अमितेशकुमार,सह. पोलीस आयुक्त, पुणे शहर, प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ४, गणेश माने, पोलीस उप. निरीक्षक जयदीप पाटील, वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष मोरे, सारस साळवी, प्रविण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, वैभव रणपिसे, नागेश सिंहकुंवर, एकनाथ जोशी, विठ्ठल वाव्हळ, भरत गुंडवाड, वैशाली माकडी यांनी केली आहे.