पुणे:
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चा वर्धापन दिन उत्साहात साजरा
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच शहर कार्यालयात कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले , या प्रसंगी बोलताना शहराघ्यक्ष दिपक मानकर म्हणाले गेली अनेक वर्षे पक्षातील कार्यकर्ते रात्र-दिवस पक्ष संघटनेकरिता काम करीत आहेत. तरी सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारची संधी मिळालेली नाही. अशा कार्यकर्त्यांची केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हास्तरीय शासकीय कमिट्यांमध्ये नियुक्ती व्हाव्यात. जेणेकरून पक्ष संघटना बळकटीच्यादृष्टीने त्यांचा उपयोग होईल .
याप्रंगी पदाधिका-यांना संबोधित करताना प्रदीप देशमुख म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन साजरा करताना आपल्या मनात आशा आणि खंत दोन्ही आहे. खंत यासाठी की राज्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आपण सर्वांनी जीवापाड मेहनत घेतली. पण त्याचे फळ आपल्याला मिळाले नाही. आपले नेते प्रफुलभाई पटेल यांना मंत्रीपदी पाहण्याची आपल्यातील प्रत्येकाची इच्छा आहे. माननीय दादा त्याबाबत निश्चित भूमिका घेतील असा मला विश्वास आहे.
आज 25 व्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या मनात आशाही खूप मोठी आहे. येत्या तीन-चार महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. माननीय दादांनी लोकसभेसाठी मित्र पक्षांना बळ देण्याची भूमिका घेतली होती. याचे कारणच होते की विधानसभा आपल्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत. दादांना आपण सर्व भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहोत. लोक म्हणतात युतीमध्ये असताना असे बोलणे योग्य नाही. मी विचारतो का बोलायचे नाही. विकासाची जाण असलेला, जनमानसात मन असलेला आपला नेता आहे. आज महाराष्ट्रातील गावागावात कार्यकर्त्यांची जाळे असलेले एकमेव नेता अजित दादा आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाच्या हितासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी अजितदादा मुख्यमंत्री व्हायला हवेत.
याच जिद्दीने, त्वेषाने आपल्याला काम करायचे आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येक गावातील कार्यकर्त्याने अजितदादांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी काम केले. महायुतीच्या जागा किती आल्या हा प्रश्न अलहिदा. पण मतांची टक्केवारी वाढली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी विचारांचा मोठा वाटा आहे. याच पद्धतीने आता आपले काम वाढवायचे आहे.
गेले पंचवीस वर्षे महाराष्ट्रात राष्ट्रवादी रुजविण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता. आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम सुरू केले आहे. अरूनाचल मधील निवडणुकांनी हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता दादांना फक्त पुण्यात, फक्त महाराष्ट्रात अडकवून ठेवता येणार नाही. राज्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी उचलली पाहिजे. आज वर्धापनदिनी आपण सर्व हाच प्रण करू.
सदर प्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर , कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख ,बाळासाहेब बोडके ,दत्ता सागरे ,बाबा धुमाळ, प्रदीप गायकवाड ,शशिकला कुंभार , मुनिर सय्यद ,विशाल गद्रे ,पूजा झोळे ,आनंद तांबे ,सुनिता चव्हाण संदीप गाडे ,विजय ढाकले ,वंदना साळवी ,दयानंद ईरकल, शिल्पा भोसले राहुल पायगुडे ,चेतन मोरे अरुण गवळे ,बाळासाहेब आहेर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पवार यांनी केले व आभार प्रदर्शन विनोद काळोखे यांनी केले