Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नारायण कृत्रिम अंग मापन शिबिरात ५०० हून अधिक दिव्यांगांचा सहभाग 

Date:

एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते उद्घाटन ;   नारायण सेवा संस्थान, उदयपूर यांच्यातर्फे आयोजन
पुणे : नारायण सेवा संस्थान, उदयपूर यांच्या तर्फे अल्पबचत भवन येथे दिव्यांगांकरिता नारायण कृत्रिम अंग मापन, मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे आणि परिसरातील ५०० हून अधिक दिव्यांग सहभागी झाले असून ४१० दिव्यांगांची मोफत कृत्रिम अंग व शस्त्रक्रियेसाठी निवड झाली आहे. 
शिबिराचे उद्घाटन एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), रामा हॉस्पिटलचे राहुल कुमार, विश्व हिंदू परिषदेचे हेमेंद्र जोशी, माजी नगरसेवक अविनाश साळवे, अग्रवाल समाजाचे मनोज अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल व इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. मेवाडी परंपरेतील सामाजिक कार्यकर्ते मयूर अग्रवाल, राजीव अग्रवाल, सतीश गुप्ता, सुरेश अग्रवाल आणि व्यापारी जगदीश प्रसाद अग्रवाल, प्रल्हाद आहुजा यांचे देखील यावेळी स्वागत करण्यात आले. 

भूषण गोखले म्हणाले, संस्थेच्या सेवांमध्ये मोफत शस्त्रक्रिया, नारायण कृत्रिम अंग वाटप, दररोज ५ हजार लोकांना अन्न पुरवणे, गुरुकुल चालवणे, ६०० आर्थिकदृष्ट्या विकलांग मजुरांच्या मुलांसाठी मोफत नारायण चिल्ड्रन अकादमी स्कूल चालवणे, स्वयंरोजगार उपलब्ध करणे यांचा समावेश आहे. शेकडो अपंगांना संगणक, मोबाईल, टेलरिंग, मेहंदी, सामूहिक विवाह आणि घरे बांधण्याचे प्रशिक्षण देणे असे अनेक प्रकल्प मानवतेसाठी उपयुक्त आहेत.
ते पुढे म्हणाले, दिव्यांगांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नारायण सेवा संस्था करत असलेले प्रयत्न आणि कार्य ही खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. मी संस्थापक कैलाश मानव आणि अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांचे पुणे शिबीरासाठी अभिनंदन करतो.
प्रशांत अग्रवाल यांनी संस्थेच्या ३९ वर्षांच्या सेवांची माहिती देताना पुढील ५ वर्षांचे व्हिजन मांडले. तसेच यावर्षी महाराष्ट्रात ११०० पेक्षा जास्त नारायण लिंब बसवण्याची घोषणा केली. राज्यभरातून ५००  हून अधिक दिव्यांग व्यक्ती शिबिरात आले आहेत. शिबिरातील ४१० दिव्यांगांची नारायण लिंब आणि कॅलिपर बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात आले. तसेच शस्त्रक्रियेसाठी निवडले गेले. या निवडलेल्या लोकांची उदयपूर येथील संस्थेत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिरात रामा हॉस्पिटॅलिटी, यशस्वी ग्रुप, ऑल इंडिया अग्रवाल कॉन्फरन्स, राउंड टेबल इंडिया, इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन, लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन, रोटरी क्लब इंटरनॅशनल, जय शिवराय प्रतिष्ठान, विप्र फाऊंडेशन, येरोडा अग्रवाल समाज, अखिल भारतीय कृषी गौळ सेवा संघ, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, महाराष्ट्र राज्य, अग्रवाल संघटना विश्रांतवाडी, ओम महावीर सोसायटी येरवडा, पिपरी चिंचवड जैन महासंघ,श्री गोद्वार सिरवी क्षत्रिय समाज, समस्त राजस्थानी समाज संघ, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, क्वालिटी पेंट्स, सी.एस. निर्मला धुळे प्रतिष्ठान, न्यू आर्य फाउंडेशन, श्री आरोग्य लक्ष्मी क्लिनिक आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र, अक्षय विकास प्रतिष्ठान कल्याणी नगर, भगवान परशुराम जन सेवा समिती, श्री सास्वत समाज ट्रस्ट पुणे यासह २५ हून अधिक स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. 
शिबीर प्रभारी रोहित तिवारी म्हणाले, कास्टिंग आणि मोजमापासाठी निवडलेल्या दिव्यांगांना पुण्यातील पुढील शिबिरात सुमारे २ ते ३ महिन्यांनंतर नारायण लिंब देण्याची व्यवस्था केली जाईल. संस्थेने उत्पादित केलेले हे नारायण लिंब्स दर्जेदार आणि वजनाने हलके असून वापरातही टिकाऊ असतील. शिबिरासाठी पुण्याव्यतिरिक्त अमरावती, नाशिक, जळगाव, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर आदी दुर्गम जिल्ह्यांमधून रुग्ण आले होते. सर्व रुग्णांना संस्थेतर्फे मोफत जेवण, चहा, नाश्ता देण्यात आला. संस्थेच्या २५ सदस्यीय संघाच्या एकजुटीने व मेहनतीने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. शिबिराचे समन्वयक जसबीर सिंग व हरीप्रसाद लड्ढा यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन माहीम जैन यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ताल नृत्य अकादमी च्या वतीने दीप्ती बसवार यांचे आरंगेत्रम संपन्न

पुणे - ;- ताल नृत्य अकादमी च्या वतीने नृत्य...